आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवर विक्री करणाऱ्यांवर छापे

Spread the love

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रतिबंधित ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखुजन्य हुक्का फ्लेवरचा साठा करून विक्री करणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई केली असून ६ ठिकाणी छापे मारले. या कारवाईत ८ लाख ३२ हजार ९६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये लष्कर व कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन परिसरात इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक व जाहिरात प्रतिबंध अधिनियमाखाली ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोथरूड व लष्कर परिसरात तंबाखुजन्य हुक्का फ्लेवरची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८९५ तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले आहेत.
हुसेन अब्दुल रहमान (वय २५, रा. कोरेगाव पार्क), हसन शेख (वय ४२, रा. महात्मा गांधी रोड, कॅम्प) आणि अब्दुल इस्माईल जाबीर (वय २८, रा. मोलेदिना रोड, कॅम्प) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनील महाडिक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदीप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे व शुभांगी म्हाळसेकर यांनी केली आहे.

get_footer();