पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राहणार उपस्थित
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विमान अपघातात निधन पावलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव सध्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांची नियमानुसार डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अजित पवार यांचे पार्थिव दुपारी ४ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे ठेवण्यात येणार आहे.
त्यानंतर उद्या सकाळी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी किरण गुजर यांनी सांगितले. अजित पवार यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राज्यभरातून नेते व कार्यकर्ते बारामतीकडे रवाना झाले असून बारामतीत मोठी गर्दी आताच झाली आहे.















