फार्मासिस्टच्या भूमिकेची जनजागृती : विद्यार्थ्यांना करिअरचे दिशादर्शन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थ केअर अँड रिसर्चतर्फे आयोजित ‘६वी फार्मालोक फार्मसी जागरूकता यात्रा २०२६’ उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या उपक्रमाद्वारे जनआरोग्य, औषध साक्षरता आणि फार्मासिस्टच्या भूमिकेबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.
या यात्रेचे आयोजन नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन (NPWA) आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI – महाराष्ट्र राज्य शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली, तर विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने वातावरण चैतन्यमय झाले. या कार्यक्रमास डॉ. ए. पी. पवार, अमित झा, डॉ. सचिन कोतवाल, डॉ. अमोल शाह, प्रा. प्रवीण जवळे, डॉ. संतोष वर्मा, डॉ. क्षितिज अग्रवाल, डॉ. सौरभ शर्मा, प्रा. एन. ए. पाटील, डॉ. व्ही. एन. जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तांत्रिक सत्रात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत फार्मसी शिक्षणातील गुणवत्ता, व्यावसायिक नैतिकता आणि करिअरच्या संधींवर प्रकाश टाकला. भारत जेनेरिक औषध निर्मितीत आघाडीवर असून, फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल भविष्य असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
तांत्रिक सत्रात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत फार्मसी शिक्षणातील गुणवत्ता, व्यावसायिक नैतिकता आणि करिअरच्या संधींवर प्रकाश टाकला. भारत जेनेरिक औषध निर्मितीत आघाडीवर असून, फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल भविष्य असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. सारिका झांबड यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले, तर डॉ. श्रावणी सोमयाजुला यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.
प्रा. गौरिशंकर स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात कार्यक्रमाचा समारोप झाला. ‘फार्मालोक’ यात्रा विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक मूल्ये रुजवणारी आणि समाजात फार्मसी क्षेत्राविषयी जागरूकता वाढवणारी ठरली.
आजच्या काळात फार्मासिस्ट हा ‘आरोग्य आणि तंत्रज्ञानाचा’ मुख्य दुवा आहे. औषध विक्री बरोबरच औषध साक्षरता आणि समाजाचे आरोग्य संवर्धन ही त्यांची मोठी जबाबदारी आहे. ‘फार्मालोक २०२६’ द्वारे आम्ही असे जागतिक दर्जाचे फार्मासिस्ट घडवत आहोत, जे सुरक्षित आणि सुदृढ समाजाचा भक्कम स्तंभ ठरतील. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन




















