• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 18, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

April 16, 2026
0
16 4 26 12
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

वाखरी पालखी तळ, भक्ती सागर, दर्शन रांग व मंदिर परिसरातील सुविधांचा आढावा : गर्दी नियंत्रणावर भर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पंढरपूर (जि. सोलापूर): पंढरपूर (जि. सोलापूर) येथे आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत तुकाराम महाराज ( देहू) यांच्या पालखी सोहळ्यांसह इतर संतांच्या पालख्या मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल होतात. या कालावधीत लाखो वारकरी भाविक सहभागी होत असल्याने त्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी विविध ठिकाणांची पाहणी केली.

वारी कालावधीत गर्दी नियंत्रणासाठी वाखरी येथे वॉच टॉवर उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच भक्ती सागर परिसरात हायमास्ट दिव्यांची संख्या वाढवून प्रकाशयोजना सुधारण्याचे निर्देश दिले. भाविकांना पायाभूत सुविधा सहज आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, यावर त्यांनी भर दिला.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरडे, तसेच पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी सचिन इथापे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (६५ एकर) आणि नदीपात्र परिसरातील सुविधांची माहिती दिली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आषाढी यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शन रांगेत विश्रांती कक्ष उभारले जात असल्याचे सांगितले.

तसेच दर्शन प्रक्रिया जलद व सुलभ व्हावी यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती देत प्रस्तावित दर्शन मंडपाबाबतही माहिती दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्या कामाचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वाखरी पालखी तळ, विसावा मंदिर, भक्ती सागर (६५ एकर), रिद्धी-सिद्धी दर्शन मंडप, दर्शन रांग, स्काय वॉक, चंद्रभागा वाळवंट, ज्ञानेश्वर दर्शन मंडप तसेच मंदिर परिसराची सविस्तर पाहणी केली.

12

Latest Articles

दुचाकी जाळणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक

सराफांना गंडा घालणाऱ्या दोघा व्यावसायिकांना अटक

April 18, 2026
पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

April 18, 2026
प्रेमसंबंधातून वकिलाच्या सेक्रेटरीचा खून

प्रेमसंबंधातून वकिलाच्या सेक्रेटरीचा खून

April 18, 2026
एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा, ९१ आरोपींवर गुन्हे

एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा, ९१ आरोपींवर गुन्हे

April 18, 2026
वधू-वर परिचय ही काळाची गरज : पुण्यात भव्य परिचय संमेलनाचे आयोजन

वधू-वर परिचय ही काळाची गरज : पुण्यात भव्य परिचय संमेलनाचे आयोजन

April 18, 2026
Load More
Previous Post

घरगुती गॅसच्या काळ्या बाजाराचा भंडाफोड

Next Post

एमडी ड्रग्जची विक्री करणारे दोन गुन्हेगार जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

दुचाकी जाळणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक

सराफांना गंडा घालणाऱ्या दोघा व्यावसायिकांना अटक

April 18, 2026
पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

April 18, 2026
प्रेमसंबंधातून वकिलाच्या सेक्रेटरीचा खून

प्रेमसंबंधातून वकिलाच्या सेक्रेटरीचा खून

April 18, 2026
एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा, ९१ आरोपींवर गुन्हे

एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा, ९१ आरोपींवर गुन्हे

April 18, 2026
पीएमपी वाहक महिलेवर चालत्या बसमध्ये चाकू हल्ला

पीएमपी वाहक महिलेवर चालत्या बसमध्ये चाकू हल्ला

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
दुचाकी जाळणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक

सराफांना गंडा घालणाऱ्या दोघा व्यावसायिकांना अटक

April 18, 2026
पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

April 18, 2026
प्रेमसंबंधातून वकिलाच्या सेक्रेटरीचा खून

प्रेमसंबंधातून वकिलाच्या सेक्रेटरीचा खून

April 18, 2026
एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा, ९१ आरोपींवर गुन्हे

एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा, ९१ आरोपींवर गुन्हे

April 18, 2026
वधू-वर परिचय ही काळाची गरज : पुण्यात भव्य परिचय संमेलनाचे आयोजन

वधू-वर परिचय ही काळाची गरज : पुण्यात भव्य परिचय संमेलनाचे आयोजन

April 18, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

दुचाकी जाळणाऱ्या पतीला पोलिसांनी केली अटक

सराफांना गंडा घालणाऱ्या दोघा व्यावसायिकांना अटक

April 18, 2026
पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

April 18, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta