शैक्षणिक यशासह क्रीडा व सहशालेय उपक्रमांतही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बावधन येथील सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी CBSE दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. स्थापनेपासून सातत्याने उत्कृष्ट निकाल देत शाळेने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
विषयानुसार गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आश्लेषा पवार हिने इंग्रजीत ९८ व समाजशास्त्रात ९५ गुण मिळवले, नैतिक शर्मा याने हिंदीत ९३, सोहम परुळेकर याने मराठीत ८४ व विज्ञानात ९४, तर अश्विन नाईक याने गणितात ९४ गुण मिळवून आघाडी घेतली.
यंदा मुलींमध्ये आश्लेषा सतीश पवार (९०.८०%) हिने शाळेत प्रथम क्रमांक मिळवला, तर मुलांमध्ये सोहम हर्षद परुळेकर (८९%) अव्वल ठरला. या यशाबद्दल सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया व असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट स्नेहल नवलाखा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांचे यश हे पालक, शिक्षक, प्राचार्य व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. सूर्यदत्ता नॅशनल स्कूल ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असून, दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत आहे.
शाळेला NABET मान्यता प्राप्त असून महाराष्ट्रातील १,७४७ CBSE शाळांपैकी केवळ १७ शाळांना ही मान्यता आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे ३४९ CBSE शाळांमध्ये फक्त ४ शाळांना NABET मान्यता असून सूर्यदत्ता त्यापैकी एक आहे.
IIRF २०२५ क्रमवारीत शाळेला महाराष्ट्रात १२वा तर देशात ३६वा क्रमांक मिळाला आहे. तसेच टाइम्स स्कूल सर्व्हेमध्ये पश्चिम विभागातील उत्कृष्ट CBSE शाळा म्हणूनही गौरव करण्यात आला आहे. शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड, बुद्धिबळ स्पर्धा, बॉक्सिंग तसेच Phoenix AI व अबॅकससारख्या प्रगत शिक्षण प्लॅटफॉर्मवर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
शाळेत आंतरशाखीय शिक्षणपद्धतीद्वारे विज्ञान, तंत्रज्ञान आदी विषयांचे एकत्रित ज्ञान दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, सर्जनशीलता व समस्यासोडवणूक कौशल्ये विकसित होतात.
क्रीडा व शैक्षणिक क्षेत्राला समान महत्त्व देत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले जाते. मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक प्रकल्प, विज्ञान प्रदर्शन, पर्यावरण जनजागृती यांद्वारे
जबाबदार नागरिक घडविण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देत समावेशक शिक्षणावर भर दिला जातो. अनाथाश्रम भेटी, शैक्षणिक सहली, सामाजिक विषयांवरील उपक्रम यांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जाते.
सादरीकरण कौशल्य, आत्मविश्वास व जीवनावश्यक कौशल्ये विकसित करण्यावरही विशेष भर दिला जातो. नवोन्मेषी शिक्षणपद्धती व आधुनिक ज्ञानाच्या साहाय्याने सूर्यदत्ता नॅशनल स्कूल विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
















