गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : विधिसंघर्षित बालक ताब्यात, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वाघोली (ता. हवेली) हद्दीतील कपड्याच्या दुकानातून चोरी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सोहेल जावेद शेख (वय २०, रा. बिराजदारनगर कालव्याजवळ, हनुमान मंदिराशेजारी, वैदूवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट-६कडून लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतीमध्ये कपड्याच्या दुकानातून चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हडपसरमधील बिराजदारनगर कालव्याजवळ सापळा रचून विधिसंघर्षित बालकासह आरोपीला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने अल्पवयीन साथीदाराच्या साहाय्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून चोरीतील ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, विधिसंघर्षित बालकासह पुढील तपासासाठी खडकी पोलिसांच्या देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.














