बार्शी पोलीस स्टेशन व नगरपरिषदेचा संयुक्त उपक्रम :गुन्हेगारीला आळा बसणार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस स्टेशन व बार्शी नगरपरिषद यांच्या तेज अभिनव उपक्रमामुळे चोरी दरोड्याच्या घटनेतील चोर-दरोडेखोर जेरबंद करण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मागिल नऊ वर्षांत पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातील ३५०० हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत.
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून व जिल्हा ग्रामीण पोलीस दल आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट, सुधीर गुळमे, उत्तरेश्वर घुले, विक्रमसिंह घाटगे, गणेश भोसले, सत्यशील घाटगे, बार्शी शहर पोलीस स्टेशन, बार्शी नगर परिषदेमधील नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सर्व सभापती, गटनेते, मुख्याधिकारी, अमिता दगडे पाटील, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार यांचे विशेष सहकार्य लाभले.
या सर्वांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल देऊन टोल फ्री क्रमांक १८००२७०३६०० प्रात्यक्षिक आयोजित केले होते. या क्रमांकावर संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना तात्काळ ऐकविला जाणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल.
ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक, नगरपरिषद मिटिंग हॉल, सुभाषनगर रोटरी क्लब हॉल, उपळाई रोड, शेंडगे प्लॉट येथे दाखविले. ही यंत्रणा सुभाषनगर भागामध्ये सुरू केली आहे.
दरम्यान, ग्राम सुरक्षा यंत्रणेकडील सत्यशील घाटगे म्हमाले की, सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाची माहिती व मार्गदर्शनासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
