सहकारनगर पोलिसांची कामगिरी : हवेली तालुक्यात दिवाळी सणादरम्यान घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : संशयिताच्या मोबाईल व्हीडिओ क्लीपवरून १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना (२०२१ ) दिवाळी सणाच्या कालावधीत हवेली पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती.
कुणाल भांगरे (वय १९), निलेश नेटके (वय २१), ईश्वर शिंदे (वय २०) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, तळजाई पठार येथे संशयावरून एकाला ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये एका अल्पवयीन मुलाशी दोन व्यक्ती जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत असल्याचे व्हीडिओक्लीप मिळून आली. दोन्ही अल्पवयीन मुले त्याच्या परिचयाची असल्याची तपासात उघडकीस आले. त्यानंतर आणखी दोघा साथीदारांना वेल्हे येथून ताब्यात घेतले. त्यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी हवेली पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आले.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण, नवनाथ शिंदे, भारत खेमकर, निलेश कुलथे, सलीम शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.















