स्वारगेट पोलिसांची कामगिरी : स्वारगेट बसथांब्याजवळील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट येथील बसथांब्यापासून पायी जाणाऱ्याचा मोबाईल चोरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. ही घटना २२ डिसेंबर २०२१ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली होती.
रवी ऊर्फ दशरथ कांबळे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अवधूत ग्रामोपाध्ये (वय ३१, रा. लक्ष्मी पार्क, नवी पेठ, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी स्वारगेट बसथांब्यापासून पायी जात होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्याजवळ येत आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता. पोलिसांनी तपास करून मोबाईल चोरट्याला अटक केली. पुढील तपास स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे करीत आहेत.














