वानवडी पोलिसांची कामगिरी : मुलीबरोबर लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लग्नाच्या आमिषाने महिलेसोबत ६ वर्षे शारिरीक सबंध ठेवले. त्यानंतर महिलेचा छळ करुन २० वर्षाच्या मुलीसोबत लग्न लावून देण्यासाठी तगादा लावला. तसेच मुलीसोबत लग्न लावू दिले नाहीतर जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देणाऱ्याला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नासीर सलाम सौदागर (वय 30, रा. संविधान चौकाजवळ, वानवडी) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड येथील एका 40 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून ऑक्टोबर २०१५ पासून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादी सोबत लग्न न करता फिर्यादी यांची २० वर्षाची मुलीसोबत लग्न लावून देण्यासाठी फिर्यादीचा मानसिक छळ केला. फिर्यादीची फसवणूक करुन फिर्यादीच्या मुलीबरोबर लग्न लावून दिले नाही तर त्याच्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी त्याने फिर्यादी यांना दिली. या छळाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन वानवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

















