हडपसर पोलिसांत गुन्हा : वैदूवाडी- गोसावीवस्तीमध्ये वाहनांचे केले नुकसान
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आम्ही इथले भाई आहोत, तुझी गाडी फोडली, तू जवळ आला तर तुलाही फोडून टाकीन, अशी धमकी देत कोयता व दगडाने गाड्यांच्या काचा फोडून नकुसान करणाऱ्याला अटक केली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. लोखंडी कोयता व दगडाने तीन वाहनांच्या काचा फोडून २० हजार रुपयांचे नुकसान केले. वैदूवाडी-गोसावीवस्तीमध्ये १ जानेवारी २०२२ रोजी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
अजित कांबळे (वय २६, रा. गोसावीवस्ती, वैदूवाडी) याच्यासह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाबुराव किसन शिसाळकर (वय २४, रा. गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून,त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी घरामध्ये झोपले असताना आरोपींनी लोखंडी कोयता व दगडांनी तीन वाहनांच्या काचा फोडून २० हजार रुपयांचे नुकसान केले. हातात लोखंडी कोयता दाखवून आम्ही या ठिकाणचे भाई आहोत, आम्ही गाडी फोडू नाही तर, काहीपण फोडू तुला काय करायचे, तुझी गाडी फोडली आहे, तू जर जवळ आला, तर तुला फोडून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीचे वस्तीतील महिलेच्या घराची काच फोडून दहशत निर्माण केली. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे पुढील तपास करीत आहेत.
