61 व्यां वाढदिवसानिमित्त विवीध सामाजिक उपक्रम : विधवा, निराधार महिलांना शिलाई मशीन व 61 कामगारांना लाईफ इन्शुरन्सचे मोफत वाटप
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनात कुटुंबप्रमुख गमावलेल्या विधवा भगिनींना, निराधार महिलांना आधार देण्याचे काम प्रभाकर बाबा कदम यांनी आपल्या 61 व्या वाढदिवसानिमित्त केले आहे.
यावेळी बोलताना प्रभाकर कदम म्हणाले, कोरोनामध्ये अनेक व्यक्तींना आपले प्राण गमावले आहेत. मात्र मागे कुटुंबाला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. घरगुती शिलाई कामाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा या सामाजिक बांधीलकीतून महिला भगिनींना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले. कात्रज-कोंढवा रोड परिसरातील नागरिकांच्या सेवेत असेच कायमस्वरूपी योगदान देऊ असे त्यांनी सांगितले.
आपण समाजाचे देणे आहोत या उदात्त हेतूने आपण हा उपक्रम राबविला असुन त्याचा समाजातील गोरगरीब लोकांना फायदा होतो याचा मनस्वी आनंद होत आहे असे मत प्रभाकर बाबा कदम यांनी व्यक्त केले.
अखिल कात्रज-कोंढवा रोड मित्र मंडळ व जनसेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर बाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून स्वीकृत सदस्य तुषार कदम यांनी कोरोना काळात कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या महिला भगिनींना मोफत शिलाई मशीन व 61 कामगार महिलांना मोफत अपघाती विमा कवच यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सुरेश कदम, राहुल टिळेकर, हरिष टिळेकर, तात्यासाहेब भिंताडे,नगरसेविका मनिषा कदम, राजाभाऊ कदम, नगरसेविका वृषाली कामठे, स्वीकृत सदस्य तुषार कदम,दीपक गुजर,योगेश शेलार, महेश जाधव,मंगेश भगत, ऋतुराज कदम, संतोष थोपटे, शंकर ढेबे आदींसह कात्रज-कोंढवा रोड, शिवशंभोनगर, सुखसागरनगर, स्वामी समर्थनगर, शेलारमळा परिसरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिकेत शिंदे यांनी केले तर आभार स्विकृत नगरसेवक तुषार कदम यांनी केले.













