स्मारकास पुष्पहार अर्पण : अनेक मान्यवर उपस्थित
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तेजस्वी विचार, ओजस्वी वक्तृत्व आणि प्रखर देशप्रेमी विचारांतून युवांना प्रेरणा देणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त बिबवेवाडी येथील त्यांच्या स्मारकस्थळी पुष्पहार अर्पण करत प्रभाग क्र २८च्या वतीने नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी, पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, श्रीपाद ढेकने, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, सहउपायुक्त गणेश सोनवणे, शिवा केंगारे, महेश कांबळे, गणेश शिंदे, अमित माशाळे, आयुष चोरबेले, सुरज आरे, कृष्णा माशाळे, किशोर मेगावत, यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
