सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांचा उपक्रम : अनेक नागरिकांनी घेतला लाभ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान व बाळासाहेब देवरस पाँलिक्लिनिक यांचा संयुक्त विद्यमानाने कात्रजमध्ये संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत बूस्टर डोस तसेच पहिला व दुसरा डोस देखील मोफत मिळणार आहे.
ज्या नागरिकांना रोजच्या कामकाजातुन घरी येण्यास उशीर होतो किंवा कामावरून लस घेण्यास जाता येत नाही अशा नागरिकांसाठी कात्रज मध्ये सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांनी माऊली गार्डन मंगल कार्यालय कोंढवा रोड येथे मोफत लसीकरण सुरु केले आहे.
बुधवारी दि. १२ जानेवारी २०२२ सायं. ६ वा. लसीकरणाचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कात्रज कार्यवाह सुभाष रायचुरकर, नगरसेविका मनिषा राजाभाऊ कदम, संजय कुलकर्णी, कल्पना शेलार, सारिका देशपांडे, शलाका मोडक, डॉ. प्रकाश सासवडे, प्रभाग अध्यक्ष सागर डुरे, उपाध्यक्ष संतोष माने, मनोज बलकवडे, मोहन पानस्कर, शशांक गड्डम, विलास पुजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हान राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
