आई-वडिलांचा जीव भांड्यात : तीनशेहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी घेत होते शोध
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा आज (१९ जानेवारी २०२२ रोजी) दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास सापडला. मात्र आज दुपारी अचानक एक व्यक्ती स्वर्णला वाकड जवळील पुनावळे येथील लोटस पब्लिक स्कूलजवळच्या इमारतीच्या वॉचमनकडे सोडून गेली. स्वर्णव सुखरुप असून. त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी म्हणजेच ११ जानेवारी रोजी अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी स्वर्णवचा सर्वत्र शोध घेत होते. अखेर आज दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. मात्र त्याचं कोणी अपहरण केलं? का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, त्याचं अपहरण कोणी?, कशासाठी केलं होतं याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र स्वर्णला ज्या वॉचमनकडे या आरोपीने सोपवलं तेव्हा काय घडलं याबद्दलचा खुलासा या वॉचमनने केलाय.
स्वर्णव कसा सापडला?
लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्या वडिलांचा नंबर होता. दरम्यान, तेथील वॉचमन दादाराव जाधव यांच्याकडे हा मुलगा सोडून ती व्यक्ती पसार झाल्यानंतर याच इमारतीमध्ये लिफ्टचं काम करणाऱ्यांनी या बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का ही खात्री करून घेतली. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. तत्काळ त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड पोलीस दाखल झाले असून, ते पुढील तपास करत आहेत.
