वाकड पोलिसांत गुन्हा : सोशल मीडियावर अश्लील शब्दांचे व्हीडिओ व्हायरल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : इन्टाग्रामवर अश्लील भाषा व शब्द वापरुन तयार केलेले व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या स्वयंघोषीत थेरगाव क्वीनसह तिघांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना बेड्या ठोकल्या.
दोन महिला व कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संगिता गोडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी इन्स्टाग्रामवर थेरगाव क्वीन या नावाने अकाउंट चालवणारी मुलगी त्याच्या सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरले. तसेच धमकीवजा व्हीडिओ तयार करुन ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. यामुळे समाजातील मुलामुलींचे नितिभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडण्यास आरोपींची ही कृती कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादी यांनी तक्रारीत केला आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन वाकड पोलिसांनी तिघांविरुद्ध भादवी कलम 292,294,506,34, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अटक केलेल्या थेरगाव येथील मुलीने आपल्याला पश्चाताप होत असून गुन्ह्याचे गांभीर्य माहित नसल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे करीत आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस अंमलदार दिपक भोसले, कल्पेश पाटील, अतीक शेख, विनायक म्हसकर यांच्या पथकाने केली.
