अंमली पदार्थ विरोधी पथक-२ची कामगिरी : आठ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अहमदनगर येथून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी संगमवाडी येथे आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ने अटक केली. आरोपींकडून आठ लाख ४६ हजार रुपये किमतीचा दोन किलो ११० ग्रॅम चरस जप्त केला.
इक्बाल शमीम खान (वय २४, रा. राजनगर, रुपीनगर, नूर इस्लाम मस्जिदशेजारी, निगडी, पिंपरी-चिंचवड, पुणे) आणि फिरोज शरीफ खान (वय ३३, रा. गुल्लाभाई गॅरेजजवळ, बारा इमाम कोटला अहमदनगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ येरवडा पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत असताना अमलीपदार्थ घेऊन दोघेजण मोटारसायकलवर थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, दोन्ही आरोपीकडील सॅकबॅगमध्ये दोन किलो ११० ग्रॅम चरस आठ लाख ४६ हजार रुपये किमतीचा आढळून आला. अंमली पदार्थविरोधी पथख-२चे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस अंमलदार देशपांडे, पोलीस हवालदार बोमादंडी, पोलीस नाईक चेतन गायकवाड, जाचक, साहिल शेख, शेळके, जगदाळे, कांबळे, आजीम शेख, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.