रात्री 11 वाजता घडली घटना : 40 जण जखमी ; अनेकजण स्लॅबखाली अडकल्याची भीती
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा येथील शास्त्रीनगर, गल्ली क्रमांक ८ येथील एका इमारतीचा लोखंडी सांगडा बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला असून त्यात किमान ५ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सुमारे ४० जखमी झाले.
शास्त्रीनगर चौक, वाडिया बंगला गेट नंबर ८ येथील नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरु होते रात्री ११ वाजता हा सांगाडा अचानक कोसळला. त्याखाली तेथे काम करीत असलेले जवळपास १० कामगार खाली दबले गेले. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रुग्णवाहिका, १०८ च्या १० रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचल
हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की त्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर करून हा सांगाडा कापला व त्यानंतर खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथून १० कामगारांना बाहेर काढून ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
जमिनीलगत सिमेंटच्या खाबांवर लोखंडाचा सांगाडा बांधण्याचे काम सुरू होते. यावेळी तेथे जवळपास ३० कामगार काम करीत होते. रात्री ११ वाजता अचानक हा सांगाडा खाली कोसळला. त्याखाली जवळपास १० कामगार अडकले होते. त्यातील ३ जणांचा जागीच मृत्यु झाला. सर्वांना बाहेर काढून ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. सांगाडा कोसळला त्यातील जाळी एका कामगाराच्या अंगात शिरली होती. ३ जणांच्या अंगात जाळीतील गज शिरले. मध्यरात्री बचावकार्य संपले असून सांगाड्याखाली अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले.