वानवडी पोलिसांची कामगिरी : २१ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा घेतला शोध
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दुकानाचे शटर उचकटून नवीन कपडे चोरणाऱ्या दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दुकान बंद असताना २५ जानेवारी रोजी रात्री १० ते २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी पावणेआठच्या दरम्यान आरोपींनी ३९ हजार ४५० रुपयांची नवीन कपडे चोरून नेली होती.
सौरभ संजय अडागळे (वय १९, रा. गोल्डन बेकरीजवळील कॉलनी, रुणवाल सोसायटीसमोर श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे) आणि अदिल मुख्तार शेख (वय १८, रा. काळेपडळ रेल्वे गेटसमोरील आर्मी गल्ली, काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या दोघांची नावे असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कृष्णा महादेव चव्हाण (वय २६, रा. स.नं.१९६, संकेत विहार गल्ली नं.१०, काळेपडळ, हडपसर) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
पोलीस अंमलदार संतोष नाईक, राठोड व कसबे यांनी परिसरातील २१ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावेळी आरोपी काळेपडळमधील असून, डोंगरावर फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून ३१ हजार ६६० रुपये किमतीची वेगवेगळ्या कंपनीचा मुद्देमाल जप्त केला असून, सौरभ अडागळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या सूचनेनुसार वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस फौजदार संतोष तानवडे, पोलीस अंमलदार राजू रासगे, अमजद पठाण, संजय बागल, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सरफराज देशमुख, सागर जगदाळे, शिरीष गोसावी, निळकंठ राठोड, अमित चिव्हे, गणेश खरात, दीपक भोईर, सिद्धेश्वर कसबे, महिला पोलीस शिपाई राणी खांदवे यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली.