हडपसर पोलिसांची कामगिरी : शेवाळेवाडी मार्केटच्या पाठीमागील घोडे कंपनीच्या रस्त्यावर अडवून घेत होते हप्ता
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत हप्ता घेणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना १ जानेवारी २०२२ ते ७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घोडकंपनी रस्त्यावरील पुल, शेवाळेवाडी मार्केटच्या पाठीमागील बाजूस अडवून हप्ता घेत होते.
अमन पंकज झा (वय १८) आणि राजेंद्र हनुमंत काळे (वय २४, दोघे रा. गंगानगर, फुरसुंगी, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्याचे मित्र कामावरून घरी जात असताना शेवाळेवाडी मार्केटच्या पाठीमागे आरोपींनी अडवून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत दररोज २०० रुपये व त्यानंतर दोन-तीन वेळा फिर्यादीकडून १००-२०० रुपये हप्ता घेत होते. हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडे यांनी तपास करून आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.














