वानवडी पोलिसांत फिर्याद : केदारी पेट्रोल पंपासमोरील मेडिकल दुकानात घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पिस्टलसदृश वस्तूच्या धाकाने पाच हजार रुपये चोरून नेणाऱ्यावर वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. वानवडीतील केदारी पेट्रोलपंपासमोर नॅन्सी टॉवरमधील वेलनेस फॉरएव्हर मेडिकलमध्ये पहाटे पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली.
राजेश अलकोंडा (वय ३९, रा. गंज पेठ, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार मोटारसायकलवरील दोन अनोळखींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी वानवडीतील केदारी पेट्रोल पंपासमोरील वेलनेस फॉरएव्हर मेडिकलमध्ये होते. त्यावेळी पहाटेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी पिस्टलसदृश वस्तूचा धाक दाखवून ड्रॉवरमधील पाच हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. वानवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.















