पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ६८ टोळ्यांवर कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील नगर रोडच्या एस. एस गँगचा स्वयंघोषीत म्होरक्या निखील देवानंद पाटील याच्यासह 23 साथिदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवली असून अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 68 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
एस. एस. गँगचा म्होरक्या निखील देवानंद पाटील, साथिदार नानासाहेब बाबुराव शिंदे, आशुतोष नानासाहेब शिंदे, शुभम रामचंद्र वाबळे, ऋग्वेद उर्फ छकुल्या जालिंदर वाळके, माऊली उर्फ केतन रामदास कोलते, ऋतिक महादु किनकर, अभिषेक रविंद्र गव्हाणे, प्रतिक अनिल कंद, ऋषीकेश सत्यवान आरगडे, शुभम उर्फ मोन्या अशोक भंडारे, आलोक महादेव सुर्यवंशी, अभिषेक भानुदास लंघे, ओंकार सुनिल इंगवले, गणेश अशोक भालेकर, अथर्व अंकुश कंद, गणेश रामकिसन राऊत, दिपक रंगु राठोड, रोहन रुषीकेश गायकवाड, रवि धोंडीराम चव्हाण, प्रतिक दिलीप तिजोरे, अक्षय बापुराव गिरीमकर, निलेश जितेंद्र काळे, निखिल नितीन जगताप अशी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
एस. एस. टोळी प्रमुख सचिन नानासाहेब शिंदे याचा खुन करण्यात आला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी निखील देवानंद पाटील याच्यासह त्याच्या साथीदारांनी 12 जानेवारी रोजी लोणीकंद भागात सायंकाळी सनी कुमार शिंदे व कुमार मारुती शिंदे यांचा धारदार शस्त्राने वार करुन खून करुन लोणीकंद परिसरात दहशत माजवली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश तकटरे यांनी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण यांना सादर केला होता. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव पुढील तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरी व सर्व्हेलन्स पथकातील पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली.















