भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : बंद फ्लॅटचे कुलूप उचटकून चोरट्याने साधला डाव
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आंबेगाव बुद्रुकमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप उचकडून दोन लाख ८९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी सव्वा बारा ते पावणेएकच्या दरम्यान आंबेगावमधील देवराई फेज-१मध्ये घडली.
नीतल भरतीया (वय ४०, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा राहता फ्लॅट कुलूपबंद होता. अज्ञात चोरट्याने कुलूप उचकटून दोन लाख ९ हजार रुपयांचे दागिने आणि रोख ८० हजार रुपये असा एकूण दोन लाख ८९ हजार किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर पुढील तपास करीत आहेत.
