हडपसर पोलिसांत फिर्याद : पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी बुद्रुक येथे घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी बुद्रुक येथे १२ मार्च २०२२ रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
किशोर इंद्रमोहन तलवाड (वय ५१) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सचिन हानवते यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पुणे-सोलापूर रस्त्यावर मांजरी बुद्रुक (स.नं.८२/१, रमेश ढोणे यांचा मोकळा प्लॉट) येथे भरधाव वाहनाची पादचाऱ्याला धडक बसून अपघात झाला. या अपघातात पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने पुढील तपास करीत आहेत.
