चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : बालेवाडीतील चंद्रलक्ष अपार्टमेंटमध्ये झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅट बंद करून पार्लरमध्ये गेल्यानंतर चोरट्यांनी एक लाख १० हजार रोख आणि सोन्या-चांदीच्या दोन लाख ८३ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. बालेवाडीतील चंद्रलक्ष अपार्टमेंटमध्ये १० मार्च २०२२ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान चोरीची घटना घडली.
रोहन काकडे (वय २७, रा. बालेवाडी, पुणे) यांनी चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी १० मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजता बालेवाडी येथील फ्लॅटला कुलूप लावून पत्नीसह पार्लरमध्ये गेले. बंद फ्लॅट पाहून चोरट्यांनी कुलूप उचकटून रोख एक लाख १० हजार आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ८३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले पुढील तपास करीत आहेत.
