आवृत्ती पुणे

सात महागड्या दुचाकी चोरणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई : पोलीस कोठडीत तपासामध्ये सहा गुन्हे झाले उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील महागड्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सराईत गुन्हेगाराकडून तीन लाख रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई अम्रपाली हॉटेल जवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर … Read more

खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या दोघांना केले जेरबंद

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका बाजूला नोकर्‍या मिळत नाही. स्वत: काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर गल्लीबोळातील खंडणीखोरांचा त्रास होत असल्याचे वारंवार दिसून येत असून या खंडणीखोरांवर कोणाच वचक नसल्याचे दिसून येत आहे. पोह्याची गाडी लावणार्‍या एका तरुणाने खंडणी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने घरातून … Read more

काँग्रेस कार्यकर्त्याची पोलीस चौकीजवळ भरदिवसा 6 गोळ्या झाडून हत्या

भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : कात्रज परिसरातील घटनेने शहर हादरले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवास गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी घडली आहे. भरदिवसा पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पुणे शहर हादरुन गेले आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या … Read more

सराईताने दारू पिऊन राडा करीत केला आत्महत्येचा प्रयत्न

वारजे पोलीस स्टेशनमधील प्रकार : आरोपी जामिनावर सुटला आहे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगाराने दारुच्या नशेत पोलीस चौकीत येऊन खिडकीच्या काचा हाताने फोडल्या असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. वारजे पोलीस चौकीत झालेल्या या खळबळजनक प्रकाराबद्दल पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मंगेश विजय जडीतकर (वय २१, रा. पारुदत्त … Read more

पुण्यात डिलीव्हरी बॉयने तरुणीकडे पाहून केले ‘लज्जास्पद कृत्य’

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : उंड्रीतील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अलीकडे ऑनलाइन खरेदीची टूमच आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही ऑनलाईन वस्तू मागवत असतात. त्याची डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉय कधीही घरी येत असतात. अशाच एका घरात डिलिव्हरी बॉयने रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी आला आणि घरात एका 23 वर्षीय तरुणीला पाहून … Read more

एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने ३४ लाखाला गंडा घालणारा जेरबंद

विमानतळ पोलिसांत गुन्हा : पुण्यातील विमानतळ नीलकमल सक्सेस प्रा.लि.मध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 100 दिवसात रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्याला जेरबंद केले असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2021 ते 3 डिसेंबर या … Read more

पीएमपी बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप

कात्रज सर्पोद्यानसमोर घडला प्रकार : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये बस चालकाविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगात जाणारी पीएमपी बस जोरात आदळल्याने बसमधील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्यात गॅप पडल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. यानंतर या प्रवाशाने थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत पीएमपी बस चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरुन … Read more

प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन

लोणीकाळभोर पोलिसांत फिर्याद : पुणे-सोलापूर रोडवर शिंदवणे रोडवरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे स्टेशनहून उरुळी कांचनला जाण्यासाठी गाडी ठरवून प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी वाटेत चाकूचा धाक दाखवून कॅबचालकाला लुटून त्याची चारचाकी गाडी चोरुन नेली. हा प्रकार हवेली तालुक्यातील शिंदवणे गावाजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडला.याप्रकरणी सुनिल यशंवत शेडगे (वय ३५, रा. मुंबई) … Read more

पुजाऱ्याला लुबाडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जादूटोणा केल्याचा आरोप : लोणीकंद पोलिसांत महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका पुजाऱ्यास तुम्ही भोंदुगिरी करता, जादुटोणा करता, तुमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची धमकी देऊन त्यांना १ लाख रुपयांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखलकरुन दोघांना अटक केली आहे. हा … Read more

पोलीस असल्याचे सांगून चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा : पुण्यातील पाषाण परिसरात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फिरायला बाहेर गेलेल्या एका ज्येष्ठ दाम्पत्याला पोलीस असल्याचे सांगून दोन चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगून हातचलाखीने २ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार सूस रोडवरील वरदाहिनी सोसायटीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.याप्रकरणी पाषाण येथील … Read more