आवृत्ती पुणे

शॉर्ट घालून फिरणाऱ्या आयटी इंजिनिअर तरुणींना चपलेने मारहाण

रक्षकनगरमधील घटना : चंदननगर पोलिसांत एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनियर तरुणी शॉर्ट घालून फिरत असल्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेने तरुणींना चपलेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.2) रक्षकनगर मध्ये घडला.याप्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध … Read more

शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ मोहिम

पुणे पोलीस : ३०५९ सराईतांची तपासणी; ७२२ गुन्हेगार पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन … Read more

उघड्यावरील वीजेचा शॉक बसून ४ वर्षाच्या ‘शहजाद’चा मृत्यू

कोंढवा पोलिसांत ठेकेदार, महावितरणविरुद्ध गुन्हा : कोंढव्यातील मिठानगरमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अरेबिक भाषेच्या शिकवणीसाठी गेलेल्या एका चार वर्षाच्या मुलाचा उघड्यावरील वीजेच्या वायरला धक्का बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मिठानगर (कोंढवा, पुणे) येथे बुधवारी (दि.2) घडली.शहजाद अमीर सय्यद (वय ४, रा. नवाझिश पार्क, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. … Read more

मी रामनगरचा ‘भाई’, तलवारीने फडशा पाडीन म्हणणारा जेरबंद

वारजे पोलिसांची कारवाई : पुण्यात तलवार नाचवत ‘भाई’ची थेट पोलिसालाच धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तलवार नाचवत परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून, त्यास तलवारीने फडशा पाडण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. वारजे-रामनगरमध्ये हा प्रकार घडला. एवढेच नाही तर मी रामनगरचा भाई असून, पोलिसांना घाबरत नाही, … Read more

मोटारसायकलची डिकी उचकटून चोरट्यांचा चार लाखांवर डल्ला

हडपसर पोलिसांत फिर्याद : हडपसर पीएमपी आगाराच्या गेटजवळ झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर चोरट्यांनी मोटारसायकलची डिकी उचकटून चार लाख रुपयांवर डल्ला मारला. हडपसर-गाडीतळ येथील पीएमपी आगाराच्या गेटजवळ ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.अरुण जाधव (वय ३५, रा. त्रिवेणीनगर, फुरसुंगी, पुणे) यांनी हडपसर … Read more

आर्मीची ऑर्डर असल्याचे सांगून व्यावसायिकाला दोन लाखाला लुबाडले

सायबर पोलिसांत फिर्याद : लष्करी गणवेशातील फोटो, आधार कार्ड पाठवून केला विश्वास संपादन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आर्मीची ऑर्डर असल्याचे सांगून १ रुपया पाठविल्यावर २ रुपये तुम्हाला परत मिळतील, असा बहाणा करुन एका तरुण व्यावसायिकाला आर्मीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तब्बल २ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी धनकवडीतील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाने भारती विद्यापीठ … Read more

कासारसाई धरणात दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डी.वाय. पाटीलमधील विद्यार्थी : पाय घसरून पडलेल्या तिघांपैकी एकाला वाचविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कासारसाई धरण (ता. मुळशी) परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. शशांक सिन्हा (वय १९), रविकुमार विनोदकुमार (वय १९) असे मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत. ते आकुर्डी … Read more

‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश करीत एका एजंटला केले जेरबंद

विमानतळ पोलिसांची कारवाई : परदेशी मुलीसह चार मुलींची सुटका महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या कारवाईत परदेशी मुलीसह इतर राज्यातील एकूण 4 मुलींची सुटका केली … Read more

दरोड्याच्या तयारीतील टोळीला ठोकल्या बेड्या

लोणी पोलिसांची कारवाई : कवडीपाट टोलनाक्याजवळील अंधाराचा फायदा घेत चौघे पळाले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पुणे–सोलापूर महामार्गावरील कवडीपाट येथे अंधारात एकत्र आलेल्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अंधाराचा फायदा घेत चौघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पोबारा केला. कुणाल नारायण जाधव (वय २२, रा. काळेपडळ, … Read more

सायबर पोलीस स्टेशनमधील महिला पोलिस तडकाफडकी निलंबित

अपर पोलीस आयुक्तांचा आदेश : गंभीर गुन्ह्यात ‘गुतवण्याची’ धमकी देऊन पैशांची मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गंभीर गुन्ह्यात ‘गुतवण्याची’ धमकी देऊन पैशांची मागणी करुन मारहाण करणाऱ्या पुणे सायबर पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस शिपायाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. लता चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बुधवारी (दि.2) रात्री उशीरा … Read more