आवृत्ती पुणे

गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील आरोपीला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई : मोक्का गुन्ह्यात चार वर्षापासून पोलिसांना देत होता गुंगारा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील मोक्का गुन्ह्यातील पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने बेड्या ठोकल्या. गुन्हे शाखा युनिट-३च्या पोलिसांनी रविवारी (दि.२०) नानंज (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे अटक केली.दिपक रमेश आमले (वय २९, रा. … Read more

वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटकाच्या गाडीवर हल्ला

दिघी पोलिसांत फिर्याद : मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांचे कृत्य कैद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटकाच्या गाडीच्या काचा फोडल्या. हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. संघटकाना धमकाविण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अमित ऊर्फ साई प्रदीप वाघमारे (वय ३५, रा. शिवतीर्थ … Read more

गोडावूनमध्ये काम करणाऱ्यास मारहाण करणारा अटकेत

चंदननगर पोलिसांत फिर्याद : महापालिकेच्या खराडीतील गोडावूनमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खराडीतील महापालिकेच्या गोडावूनमध्ये नोकरीस असलेल्या दोघांना रॉड व दगडाने मारहाण करणाऱ्यास चंदननगर पोलिसांनी अटक केली. खराडीमधील स.नं.२० मध्ये १९ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.कैलास धोंडिबा भगत (वय ३२, रा. यशवंतनगर, खराडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

बहिणीच्या प्रेमीकावर कोयत्याने वार करणाऱ्यांवर गुन्हा

दिघी पोलिसांत फिर्याद : पुण्यात झाली सैराटची पुनरावृत्ती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमाने आंधळे झालेल्या बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भावाने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रेमवीरावर भररस्त्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर बहिणीला घेऊन गेले. ही घटना रविवारी (दि.20) सकाळी आठच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकातील सार्वजनिक रोडवर घडली. याप्रकरणी चार … Read more

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन चोरणाऱ्यावर गुन्हा

कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद – बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया गेटजवळ घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कवडेवाडीचा रस्ता विचारण्याचा बहाणा करत गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांची सोन्याची चेन चोरून नेणाऱ्या चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया गेटवळ १९ फेब्रुवारी २०२२ रोजी ही घटना घडली. चंद्रकांत तापकीर (वय ६६, रा. कल्याणीनगर, … Read more

आम्ही इथले भाई आहे अशी धमकी देणारे दोघे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : कात्रजमधील भारतनगरला जाणाऱ्या रस्त्यावर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही इथले भाई आहे, कोणी पुढं आल्यास सोडणार नाही, अशी धमकी देऊन मारहाण करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. कात्रजमधील भारतनगरला जाणाऱ्या रस्त्यावर १९ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. दयानंद भीमराव सीतापराव (वय … Read more

बार्शीत मधुमेहींसाठी अल्पदरात रक्त तपासणी

प्रकल्प प्रमुख आदित्य कोठारी यांनी घेतले परिश्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : लायन्स, लिओ क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब ऑफ तेजस्विनी व कोठारी लॅबोरेटरीने दर मंगळवारी अल्पदरात मधुमेह रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख आदित्य कोठारी यांनी केले आहे. मागील ९० दिवसांतील रक्तातील सरासरी साखरेचे प्रमाण … Read more

बार्शीत शिवजयंती उत्सव शांततेत साजरा

पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या प्रयत्नांना यश : शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या प्रयत्नाने बार्शीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात मात्र शांततेत पार पडला आहे. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि रामदास शेळके यांनी … Read more

जन्मदातीने पोटच्या १३ वर्षाच्या पोराचा गळा घोटला

येडगाव (ता.जुन्नर) मधील घटना – अनैतिक संबंधाला ठरत होता अडथळा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जन्मदात्या आईनेच १३ वर्षाच्या मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार येडगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक कारण समोर आला. ज्या कारणासाठी आईने मुलाचा … Read more

मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून

शिरवळमध्ये प्रचंड खळबळ – शिरवळ पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज परिसरातील मटका व्यवसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील फुलमळा परिसरातील लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी एका संशयिताला … Read more