आवृत्ती पुणे

तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराची ५५ वर्षाच्या आईला मारहाण

विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : शनिवार पेठेतील राहत्या घरी घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईला माऊलीपासून अनेक उपमा दिल्या जातात. मात्र, याच आईवर आता छोट्या छोट्या कारणावरुन हात उचलण्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. कबतुर घरात का घेऊन आला, असे विचारल्याने एका तडीपारी संपल्याने घरी आलेल्या गुन्हेगाराने आपल्या ५५ वर्षाच्या आईला उलथण्याने … Read more

पोलिसांना कोयत्याच्या धाकाने धक्काबुक्की करणारा जेरबंद

सांगवी पोलिसांची कारवाई : पिंपळे सौदागर येथे घडला धक्कादायक प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार आदेशाचे उल्लंघन करुन शहरात वावरणाऱ्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांना कोयत्याचा धाक दाखवून धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली. सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.सलीम पापा शेख (वय-36 रा. … Read more

गुन्ह्यातून सुटला अन् पिस्टल बाळगला म्हणून केले जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कुख्यात गुंड पप्पू तावरे खून प्रकरणात मागील आठ वर्षापासून येरवडा जेलमध्ये असलेल्या आरोपीची एक महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता करण्यात आली. जेलबाहेर आल्यानंतर स्वसंरक्षणार्थ विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ने अटक केली. ही कारवाई पुण्यातील धायरी येथील … Read more

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : १८ गुंठे जमीन आणि चार लाख ६० हजार घेतले व्याजापोटी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सात लाखाचे चार लाख ६० हजार रुपये आणि १८ गुंठे जमीन नावावर करून घेणाऱ्या सावकाराला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ५७ लाख ३८ हजार ५४० रुपये, सोन्याचे दागिने ४८ लाख ६२ हजार ५०० … Read more

व्याजाच्या पैशासाठी जीवे मारण्याची धमकी देणारा सावकार गजाआड

गुन्हे शाखा युनिट-४ची कारवाई – चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खासगी सावकार व्याजापोटी मनमानी पद्धतीने पैसे वसूल करीत असल्याच्या तक्रारी पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच एका सावकाराचा अजब कारभार समोर आला आहे. सावकारीचा परवाना नसताना 20 लाख रुपये व्याजाने दिल्यानंतर वसुलीसाठी दुकानात जाऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी … Read more

पाणी पुरविण्याचे काम पळविल्याच्या कारणावरुन तरुणावर वार

उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : खडकवाडी येथील बांबू हॉटेलजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जगात तिसरे महायुद्ध पाण्याच्या समस्येवरुन होईल, असे सांगितले जात असते. मात्र, आता गावांगावांच्या बाहेर उभारलेल्या फॉर्म हाऊसला पाणी पुरविण्यावरुन व्यावसायिक स्पर्धा सुरु झाली आहे. त्यातून एका तरुणावर चाकूने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना … Read more

पादचारी महिलेचा मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसात फिर्याद : भोसले गार्डनसमोरील रस्त्यावर झाली मोबाईल चोरीची घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पादचारी महिलेच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमधील भोसले गार्डनसमोर २२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोबाईल चोरी झाली.काळेपडळ (हडपसर) येथील ३० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more

आहार-योगाविषयक माहितीबरोबर व्यायामाचे प्रशिक्षण देणार

द इंडियन न्यूट्रिशियन कोच संस्था : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १२ दिवस दर शनिवारी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा त्यांना १२ दिवसांचे शिबिर दर आठवड्याच्या शनिवारी पोलीस मुख्यालयात घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आहार, योगाविषयी माहिती, तसेच व्यायामाचे प्रशिक्षण तज्ज्ञांकडून दिले जाणार असल्याचे द इंडियन न्यूट्रीशियन कोचच्या वतीने देण्यात येणार … Read more

अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यावर सोडले घरी

खडकी पोलिसांत गुन्हा : पळवून नेऊन मंदिरात केले होते लग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वयाने आपल्यापेक्षा निम्म्याने लहान असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्याबरोबर मंदिरात लग्न केले. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर तिला माहेरी आणून सोडून तो निघून गेला. शेवटी या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. ही घटना सप्टेंबर २०२० … Read more

पादचाऱ्याचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा

बिबवेवाडी पोलिसात फिर्याद : स्वामी विवेकानंद रोडवर घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रोडवर पादचाऱ्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. सागर औरसंगे (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more