आवृत्ती पुणे

विमाननगरमधील हॉटेलमध्ये हुक्का बारवर छापा

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विमाननगरमधील हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने कारवाई केली. दोन लाख तीन हजार ९०० रुपयांचा हुक्का फ्लेवर्स, ११ हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन मोटारसायकल जप्त केल्या असून, विमानतळ पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलमालक सचिन अशोक रणपिसे … Read more

सराईताला जेरबंद करून तीन दुचाक्या केल्या जप्त

सहकारनगरपोलीस स्टेशनमधील तपास पथकाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सहकारनगर पोलीस स्टेशनमधील तपास पथकानेन धनवकडी स्मशानभूमीजवळ सराईत गुन्हेगाराला संशयावरून ताब्यात घेऊन तीन दुचाक्या जप्त केल्या. त्याने तळजाई बसस्टॉपजवळ ठेवलेल्या दोन दुचाक्या काढून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. शुभम विलास भगत (वय २०, रा. सावरकर चौकाजवळ, दत्तमंदिरासमोर धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, सहकारनगर पोलीस … Read more

थोर-महात्म्यांची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सतत काही ना काही तरी कारणामुळे वादग्रस्त ठरलेल्या अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणार्‍या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा … Read more

कोंढवा आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने काढले आहेत. पोलीस निरिक्षक जगन्नाथ आनंदराव जानकर (गुन्हे शाखा ते पोलीस निरिक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस स्टेशन), तर पोलीस निरिक्षक शब्बीर सत्तार सय्यद … Read more

स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 34 लाखांचा गंडा

ब्रह्मा इस्टेट येथे घडला प्रकार : कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने दोघांनी एका 55 वर्षीय व्यक्तीची 34 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते 2019 या कालावधीत पुण्यातील कोंढवा खु. येथील फोनीक्स ग्रॅुप इंडीया ब्रह्मा इस्टेट येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा … Read more

क्रेडीट कार्डद्वारे 3.2 लाखाची फसवणूक करणाऱ्या चार परप्रांतीयावर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क क्रेडीट कार्डद्वारे फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगाल, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील बँक खातेधारकांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. आरोपींनी 3 लाख 19 हजार 806 रुपयांची फसवणूक केली आहे. मोनाफल्ली शेख (रा. वेस्ट बंगाल), रजपुत शिवकुमार रनविजय (रा. सुरत, गुजरात), समीर अक्तर, लोया साई किशोर (रा. आंध्रप्रदेश) असे गुन्हा … Read more

परप्रांतीय कंटेनरचालकास लुटणारे तिघे सराईत जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : वानवडीतील सातवनगर येथे आरोपींना घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क परप्रांतीय कंटेनरचालकास लुटणाऱ्या तिघांना जेरबंद केले. त्याच्याकडून मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यासाठी वापरलेली कार जप्त केली. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी सातवनगर वानवडी येथे केली. अतुल विजय कचरावत (वय २५), प्रशांत लखन कचरावत (वय २७, दोघे रा. संतोषनगर रोड, सातवनगर, वानवडी), शुभम … Read more

पोलिसांना एक वर्षांपासून गुंगारा देणारा जेरबंद

युनिट-१ची कारवाई : पर्वती दर्शनमधील सराईत देत होता गुंगारा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मागिल एक वर्षापासून पर्वती दर्शन परिसरातील सराईत गुंड एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्यास जेरबंद केले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी, जबरी दुखापत, दरोड्याची तयारी, हत्यार बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे असे नऊ … Read more

बार्शी, बारामती, कुर्डूवाडी, टेंभुर्णीमध्ये चोरी करणारे चौघे जेरबंद

बार्शी पोलिसांची कारवाई : आरोपी सराईत गुन्हेगार, विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस स्टेशन हद्दीसह बारामती, कुर्डुवाडी, टेंभुर्णीमध्ये चोरी करणाऱ्या चार सराईतांच्या बार्शी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीवर नवी मुंबई, ठाणे, रायगड या जिल्हयातील रेकॉर्डवरील आरोपी आहेत. आरोपी महेंद्र उर्फ मोटया अविनाश पाटील तुर्भे पोलीस स्टेशनमधून तडीपार आहे. … Read more

गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्यास कोयत्याच्या धाकाने लुटणारा सराईत जेरबंद

खडक पोलिसांची कारवाई : भवानी पेठेतील चुडामन तालमीजवळ लुटीचा घडला होता प्रकार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क तडीपार गुन्हेगाराने भवानी पेठेतील चुडामन तालमीजवळ भारत गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करणाऱ्याला अडवून कोयत्याचा धाक दाखवून दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल भिंतीवर आपटून नागरिकांमध्ये दहशत केली. आरबाज ऊर्फ बबन शेख असे अटक केलेल्याचे … Read more