आवृत्ती , पुणे

एकाच प्लॉटची दुबार विक्री करून फसवणूक

दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून नुकसान: जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मांगडेवाडी परिसरात एकाच प्लॉटची दोघांना विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच संबंधितांनी दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण करून कंपाऊंड तोडत आर्थिक नुकसान केले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नानासाहेब आत्माराम देवकर (वय ४५, रा. होळकरनगर, आंबेगाव … Read more

आडते असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी (दि. २२ मे) आयोजित करण्यात आला. यावेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ कुंजीर, उपाध्यक्ष (फ्रूट विभाग) रोहन जाधव, उपाध्यक्ष (तरकारी विभाग) संतोष कुंभारकर, उपाध्यक्ष (कांदा-बटाटा विभाग) अप्पासाहेब कोरपे, सचिव महेश शिर्के … Read more

बार्शीत तालुका कृषी विभागाची मोठी कारवाई : 7.52 लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त

हुबेहूब बनावट पॅकिंग उघडकीस : हजारो शेतकरी फसवणुकीपासून बचावले महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका कृषी विभागाने बोगस उडीद बियाणे विक्रेत्याविरोधात धडक कारवाई करत तब्बल 7 लाख 52 हजार 640 रुपयांचे बनावट बियाणे जप्त केले. या कारवाईमुळे हजारो शेतकरी आर्थिक फसवणुकीपासून वाचल्याची भावना व्यक्त होत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला मंगळवारी दुपारी सुमारे 4 … Read more

जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची पेट्रोल पंपांवर अचानक तपासणी

इंधन टंचाई, काळाबाजार रोखण्यासाठी कंपन्यांना कडक इशारा : जिल्हाभर संयुक्त भरारी पथके सक्रिय महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांनी जिल्ह्याला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध ठेवावा आणि शहरी तसेच ग्रामीण भागात दैनंदिन मागणीनुसार इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा, असे स्पष्ट निर्देश … Read more

भारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत भूमची स्वानंदी महामुनी जिल्ह्यात प्रथम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : भारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर, भूम येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी स्वानंदी हारिभाऊ महामुनी हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेसह भूम शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अत्यंत कमी वयात मिळविलेल्या या यशामुळे सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि … Read more

शासकीय आदेश धुडकावणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल

मतदार यादी पुनर्परीक्षण मोहिमेत काम करण्यास नकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभर विशेष मतदार यादी पुनर्परीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सोपविण्यात आलेल्या शासकीय कामास नकार देणाऱ्या शिक्षकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र हरिचंद्र थोपटे (रा. आंबेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते … Read more

सराईत गुन्हेगाराकडून २ पिस्टल, २ काडतुसे जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : मांगडेवाडीतील सुंदरनगर येथे कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मांगडेवाडी येथील सुंदरनगर परिसरात कमरेला दोन पिस्टल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोहम गोविंद धुमाळ (वय १८, रा. पुण्यनगरी सोसायटी, कृष्णा इन्क्लेव्ह, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास … Read more

तरुणाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून २५ लाख ९० हजारांची रोकड लांबवली

धनकवडीतील टपाल कार्यालयाजवळ भरदिवसा घटना : दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायातील रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात असलेल्या तरुणाच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर स्प्रे मारून दोन चोरट्यांनी तब्बल २५ लाख ९० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना धनकवडी येथे घडली. चोरट्यांनी रेकी करून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला … Read more

भररस्त्यात पत्नीचा निर्घृण खून : आरोपी काही तासांत जेरबंद

चारित्र्याच्या संशयातून धारदार हत्याराने सपासप वार महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात रविवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने भरदिवसा रस्त्यातच पत्नीला अडवून धारदार हत्याराने गळा, मान आणि पोटावर सपासप वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बार्शी-परांडा रोडवरील प्रविण हॉटेल परिसरात घडली. या घटनेमुळे … Read more

अहमदाबादमधील बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांचा छापा

दुबईतील कंपनी असल्याचे भासवून ७० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक : दोन संचालक अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुबईस्थित कंपनी असल्याचे भासवून कॉल सेंटरसाठी प्रोजेक्ट आणि सेटअप उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली तब्बल ७० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अहमदाबादमधील बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली आहे. खुशी कौशल परमार ऊर्फ … Read more