आवृत्ती , पुणे

लाडकी बहिणीच्या नावाने वृद्ध महिलेचे दागिने केले लंपास

हडपसरमधील भाऊराव पाटील चौकातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने बहिणीच्या नावावर दर महा १५०० रुपये पाठविण्याची लाडकी बहिण योजना सुरु केल्यापासून तिचा मोठा गाजावाजा होत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरुन मते दिली. याच लाडकी बहिणीच्या नावाने आता महिलांना लुबाडण्याचे सत्र सुरु झाले आहे. लाडकी बहिणीचे पैसे देत असल्याचे … Read more

दादावाला ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित अभिजया लोकनृत्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या ए. एस. डी. बी. दादावाला जुनिअर कॉलेजच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजया आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. दि. २८ व २९ नोव्हेंबर २०२४ रोजी या स्पर्धेचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेद्वारे विविध शालेय तथा महाविद्यालयीन … Read more

भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यासाठी घेऊन त्याचाच केला खून

उपकाराची अशी केली परतफेड : हवेली पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात ते भागीदार होते. भागीदाराने स्वत:च्या फ्लॅटवर कर्ज काढून १८ लाख ५० हजार रुपये वापरण्यास दिले होते. या कर्जाची परतफेड न करता, त्याचाच खून करून त्याने केलेल्या उपकारांची अशी परतफेड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हवेली पोलिसांनी … Read more

अश्लिल बोलल्याने मुलाच्या डोक्यात घातला दगड

तीन अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शाळेतून घरी पायी जात असताना एकाच्या बहिणीविषयी अश्लिल बोलल्याने तिघा अल्पवयीन मुलांनी १५ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत १५ वर्षाच्या मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल … Read more

दोघा गुंडांकडून साडेचौदा लाखांचे मॅफेड्रॉन पकडले

विरोधी टोळीचा गेम करण्यासाठी बाळगले होते पिस्टल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकाने दोघांना पकडून त्यांच्याकडून १४ लाख ६० हजार रुपयांचे मॅफेड्रॉन (एम डी) हस्तगत केले आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्टलने विरोधी टोळीचा गेम वाजविण्यात येणार असल्याचे … Read more

समाजातील लोकांनी तरुणाला केली मारहाण

दुसर्‍या समाजातील महिलेशी लग्न केल्याचा गैरसमज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुसऱ्या समाजातील महिलेशी लग्न केल्याच्या गैरसमजातून तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रहाटणी येथे राहणाऱ्या एका ३९ वर्षाच्या तरुणाने वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुलतानाराम सुतार (रा. गंगाधाम चौक, मार्केटयार्ड), वासुसिंग भाटी (रा. … Read more

रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

१७ तरुणांना दिले बनावट नियुक्ती पत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून नोकरीचे नियुक्तीपत्र देण्याचा बहाणा करुन एका महाभागाने पुण्यातील १७ तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत पिंपरी येथील ३५ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश राजगुरु (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पार्थडी शिवार, नाशिक) याच्यावर … Read more

पीएमआरडीएच्या पथकाकडून अनधिकृत होर्डीगवर कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मौजे हिंजवडी (ता. मुळशी) येथील अनधिकृत होर्डिंगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. संबंधित होर्डिंग काढून टाकत ते पीएमआरडीएच्या पथकाकडून जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत साधारणपणे 40 x 20 चौ. फूट क्षेत्रावरील अनधिकृत होर्डिंग क्रेन, गॅस कटर आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. त्यावेळी उपस्थित … Read more

कोयत्याने वार करुन लँड एजंटची निर्घुण हत्या

सिंहगड रोडवरील कोल्हेवाडीतील घटना : आर्थिक वादातून झाला प्रकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एजंटावर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. आर्थिक वादातून हा खुन झाल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश सुदाम थोपटे (वय ३८, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हवेली … Read more

आता दुचाकीस्वाराबरोबर सह प्रवाशाला हेल्मेट सक्ती

वाहतूक शाखेकडील ई-चलान मशीनमध्ये स्वतंत्र हेड खाली होणार कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर (सह प्रवासी) यांचे अपघात व मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व … Read more