आवृत्ती पुणे

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

PMRDA मार्फत TDR, मूल्यांकन व भरपाईबाबत महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्प आणि जमीन अधिग्रहणाशी संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात महत्त्वपूर्ण बैठक झाली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जमिनीच्या TDR (Transferable Development Rights) प्रक्रियेतील अडचणी, भूखंडांच्या योग्य मूल्यांकनाबाबतच्या अपेक्षा, … Read more

राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्हा/राज्य पातळीवर “जनसुनावणी किंवा महिला जनसुनावणी” आयोजित केली जात आहे. ही महिला जनसुनावणी पुण्यामध्ये २ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, पाचवा मजला, पुणे येथे होणार आहे. ही जनसुनावणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या … Read more

विवाहितेला गॅलरीतून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

वॉचमनने वाचविले प्राण : पतीसह ६ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : २५ लाख रुपये खर्च करुन लग्न लावून दिल्यानंतरही वेळोवेळी आई वडिलाने जावयाला ५० लाख रुपये दिले. तरीही पतीने वेळोवेळी मारहाण करुन विवाहितेला बिल्डिंगचे गॅलरीतून ढकलून देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिचा आरडाओरडा ऐकून वॉचमनने धावत येऊन तिला … Read more

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : 288.17 कोटींच्या श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखड्यास मान्यता महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरु करुन कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी श्री क्षेत्र भीमांशकर विकास आराखडा (कुंभमेळा 2027- गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा) 288.17 … Read more

दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

फ्लॅटचा ताबा देण्यासाठी ३५ हजारांची लाच घेतली : लाचलुचपत विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : न्यायालयाच्या आदेशानंतर भाडेकरूच्या ताब्यातून फ्लॅट मिळवून दिल्यानंतर मालकाकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना दोन न्यायालयीन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गजाआड झालेल्या लिपिकांची नावे रवींद्र हिंदुराव पवार (वय ४०) आणि अमित बबन भुसारी (वय ३४) अशी आहेत. दोघांचीही … Read more

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मा. नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते एस. टी. महामंडळ भूम आगार येथे कार्यरत असलेले कर्मचारी अब्दुल शेख यांचे चिरंजीव आदिल शेख यांनी जेईई मेन्स परीक्षेत ९८.९९% आणि महाराष्ट्र सीईटी परीक्षेत ९८.८४% गुण प्राप्त करून आयआयटी जम्मू-काश्मीर येथे प्रवेश मिळविल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा … Read more

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

अधिकार नसताना परवाना निरीक्षकाकडून कोऱ्या नोटिसा : आर्थिक व्यवहाराचा संशय, चौकशीची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागात अधिकारांच्या अतिरेकामुळे अनियमितता समोर येत असून, एका निरीक्षकाने नियम डावलून व्यापाऱ्यांना कोऱ्या नोटिसा पाठवल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी … Read more

वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

‘आई प्रतिष्ठान’, वाघोलीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रौप्य महोत्सवी उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ‘आई प्रतिष्ठान’ गेली २५ वर्षे अखंडपणे चहा, बिस्किटे, बटर आणि पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करते. यंदाही मंगळवारी बेलसर फाटा येथे तब्बल एक लाख कप चहा वारकऱ्यांना वितरित करण्यात आला. वर्ष २००० मध्ये मनोज कांकरिया, चंद्रशेखर … Read more

किराणा दुकानात गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई

आंबेगाव पोलिसांनी पाच दुकानदारांना केली अटक; ४९ हजारांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किराणा दुकान व पानटपरीवर गुटखा, सिगारेटची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर आंबेगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. कात्रज, आंबेगाव व वडगाव येथील पाच दुकानदारांना अटक करून त्यांच्या कडून ४९ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राहुल प्रकाश संचेती (वय ३२, रा. … Read more

दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

कात्रजमध्ये भारतीय पासपोर्ट-आधार-पॅनकार्डासह गैरकायद्याने वास्तव; आंबेगाव पोलिसांची धडक कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीररित्या भारतात येऊन भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड आणि पॅनकार्ड मिळवून कात्रजमध्ये राहत असलेल्या दोन बांगलादेशी बहिणींसह तिघांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. दोघीही बुधवार पेठेत एकमेकींना भेटल्या. मोठ्या बहिणीचा विवाह बिहारमधील व्यक्तीशी झाल्याने तिला १५ वर्षांचा मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी … Read more