आवृत्ती पुणे

तुमचा पासवर्ड हॅक तर झाला नाही ना?

व्यवहारासाठी वापरणाऱ्या ई-मेल, मोबाईलचा पासवर्ड खबरदारी म्हणून बदला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जगभरातील ३० डेटाबेसमधील १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, अ‍ॅप आदी सेवांचा समावेश त्यामध्ये आहे. सायबर न्यूजच्या संशोधकांनी ही चोरी उघडकीस आणली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनी तसेच व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून … Read more

पालखी सोहळ्यात सापडलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन केली परत

कांचन येळवंडे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक : भाविक म्हणतो, “माऊलींच्या कृपेने चैन परत मिळाली” महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आळंदीतील पालखी सोहळ्यादरम्यान हरवलेली १० तोळ्यांची सोन्याची चैन कांचन येळवंडे यांनी प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्त केली. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पुणे मुक्कामाकडे प्रस्थान झाले. माऊलींना निरोप … Read more

वारकऱ्यांच्या पावन यात्रेला जैन महासंघाचा श्रद्धेचा नमस्कार

आष्टा (भूम) येथील दिंडीचे स्वागत : शंभर वारकऱ्यांना भेटवस्तू वितरित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने वारकरी बंधू-भगिनींचा सन्मान करत त्यांच्या भक्तीचा गौरव करण्यात आला. आष्टा (भूम) येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडीचे स्वागत महासंघाचे उपाध्यक्ष संतोष गुगळे यांच्या निवासस्थानी करण्यात आले. या दिंडीचे प्रमुख वीणेकरी विठ्ठलराव आणि भोजन सहयोगी पोपटलालजी गुगळे … Read more

हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

मासिक ११ ते २२ टक्के परताव्याचे आमिष, फसवणुक झालेल्यांमध्ये डॉक्टर, अभियंत्यांचा समावेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मासिक ११ ते २२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत, कायदेशीर इनव्हॉइस डिस्काऊंटिंग प्लॅटफॉर्मच्या नावाखाली हैदराबादस्थित कंपनीने पुण्यातील ३६ गुंतवणूकदारांची तब्बल ८ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणुकीत डॉक्टर, आयटी अभियंते आणि … Read more

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाची कारवाई : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार आरोपी अक्षय शांताराम सावंत (रा. कर्वेनगर) यास गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने कोथरूड परिसरातून अटक केली. दोन वर्षांसाठी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून हद्दपार असलेला आरोपी आदेशाचे उल्लंघन … Read more

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डीचा उपक्रम : अनाथ बालकांप्रती सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमाला सदिच्छा भेट देत, अनाथ व निराधार लहान मुलांप्रती सामाजिक बांधिलकीची जाणीव कृतीतून अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्यात मिसळून … Read more

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

कात्रजमधील आंबेगाव परिसरातील घटना : नणंदेच्या त्रासाला कंटाळून केले कृत्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वैण्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच, कात्रजमधील आंबेगाव परिसरात एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नंदेच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. मयुरी शशिकांत … Read more

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखी रथावर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम : शुक्रवारी शहरात येणार पालख्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या त्यांच्या मार्गावर नेमक्या कोठे आहेत, याची माहिती आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. ही माहिती मिळाल्याने नागरिकांना दर्शनासाठी खूप अगोदर येण्याची गरज भासणार नाही. पालखी रथ दर्शनाची माहिती मिळाल्यामुळे रस्त्यावरील अनावश्यक गर्दी … Read more

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

पाच ठिकाणी हाईट बॅरिअर बसविणार : रॅम्बलर व गतीरोधक बसविणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गंगाधाम चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दिपाली सोनी यांचा मृत्यू झाल्यानंतर शहर पोलीस दलाने या परिसरातील वाहतूक नियोजनाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार मार्केटयार्ड वाहतूक विभागाच्या अंतर्गत कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक, टिळेकर नगर ते गंगाधाम चौक दरम्यानच्या रस्त्यांवर … Read more

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

पसार झालेल्या आरोपीला इंदौर येथून घेतले ताब्यात : आंबेगाव पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जांभुळवाडी येथील तलावावर एका तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपीला मध्यप्रदेशातील इंदौर येथून अटक करण्यात आली आहे. सुरज गणेश सूर्यवंशी (वय २२, रा. गणेश पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दीपक बंडगर (वय २१, रा. नर्‍हे) … Read more