आवृत्ती , पुणे

मराठा आरक्षणासाठी लढा दिलेल्या बांधवांचा अविनाश नगर येथे सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला मोठे यश मिळाले. मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजाने शांततेत आंदोलन केले. समाजाच्या या एकजुटीसमोर महायुती सरकारला झुकावे लागले आणि शेवटी आरक्षण जाहीर करावे लागले. या लढ्यामध्ये भूम तालुक्यातील अनेक सकल मराठा बांधवांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आझाद मैदानापर्यंत सक्रिय सहभाग … Read more

७७ तोळे सोने, १६ मोबाईल आणि लाखोंची रोकड जप्त

पोलिसांनी घेतली बंडु आंदेकरच्या घराची झाडाझडती, वाडेकर यांच्या घरावरही छापा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष गणेश कोमकर याचा निर्घृण खून करणाऱ्या आंदेकर टोळीविरोधात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बंडु आंदेकर आणि वृंदावनी वाडेकर यांच्या घरांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि … Read more

बार्शीमध्ये जिजामाता कन्या प्रशालेत ‘सशक्त मन – निरोगी तन’ व्याख्यान”

“डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन” महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : जिजामाता कन्या प्रशालेत रोटरी क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने “सशक्त मन – निरोगी तन” किशोरवयीन मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी डॉ. मंजुषा कुलकर्णी मॅडम प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आर. … Read more

मारहाण करून मोबाईल चोरणारा चोरटा गजाआड

अपघातानंतर केली होती मारहाण, दोन अल्पवयीन ताब्यात : सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अपघात झाल्यानंतर नुकसानभरपाईची मागणी करून मारहाण करून दोन मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहेत. अनिकेत गणेश शिंदे (वय १९, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी … Read more

आंदेकर टोळीच्या १३ जणांवर मोक्का कारवाई

आयुष कोमकर खून प्रकरण : आंदेकर टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नाना पेठेतील टोळीयुद्ध आणि गृहकलहातून आयुष कोमकर याचा खून करणाऱ्या टोळीप्रमुख बंडू आंदेकर याच्यासह १३ साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा आयुष कोमकर हा बंडू … Read more

लाच घेताना महिला हवालदाराला सापळा रचून पकडले

विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात मागितली होती १ लाखांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सासरी होणाऱ्या छळाच्या गुन्ह्यात पीडित महिलेच्या बाजूने उभे राहण्याऐवजी महिला पोलीसच आरोपींना पैशांसाठी मदत करीत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपींना अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी १ लाखांची लाच मागून, तडजोडीनंतर २० हजार रुपये … Read more