आवृत्ती , पुणे

१९ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू

वीरकर बिल्डरसह साईट सुपरवायझर : लेबर कंत्राटदारावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर येथे सुरू असलेल्या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. सुरक्षा साधने न पुरविल्याच्या कारणावरून पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक वीरकर, साईट सुपरवायझर आणि लेबर कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रागीब एहसान रकीब (वय १९, सध्या … Read more

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या ३०० विद्यार्थ्यांचा मानवतावादी उपक्रम : संवाद व अहिंसेचा संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सूर्यदत्त नॅशनल स्कूलमधील ३०० विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या चौकटीपलीकडे जाऊन वैश्विक पातळीवर एक महत्त्वपूर्ण व मानवतावादी उपक्रम हाती घेतला आहे. वैश्विक स्तरावर वाढत्या संघर्षांविषयीची जाणीव, तसेच सामाजिक बांधिलकीची तीव्र भावना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सामूहिक निवेदन तयार … Read more

सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

शैक्षणिक यशासह क्रीडा व सहशालेय उपक्रमांतही विद्यार्थ्यांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बावधन येथील सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी CBSE दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. स्थापनेपासून सातत्याने उत्कृष्ट निकाल देत शाळेने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विषयानुसार गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आश्लेषा पवार हिने इंग्रजीत … Read more

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने केले कृत्य : मार्केटयार्ड पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक व लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केला. मार्केटयार्ड पोलिसांनी आत्याच्या मुलाला अटक केली आहे. रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव … Read more

वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा दाखल

२ हजार गुंतवणूकदारांच्या ४३ कोटींच्या ठेवी बेकायदेशीरपणे स्वीकारल्या : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत पार्टनर करून घेतो, असे कागदोपत्री दाखवून दरमहा १ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत प्रत्यक्षात लोकांकडून ठेवी स्वीकारल्या जात होत्या. कोणत्याही शासकीय संस्थेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ठेवी स्वीकारल्याच्या कारणावरून वेलेंटिना इंडस्ट्रीजच्या संचालकांवर आर्थिक गुन्हे … Read more

जाणीव फाऊंडेशनतर्फे महामानवांची संयुक्त जयंती व पुस्तके वाटप उपक्रम संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जाणीव फाऊंडेशनतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रम व प्रेरणादायी ग्रंथवाटप उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त सातारा रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दोनशे शैक्षणिक व महापुरुषांवरील प्रेरणादायी पुस्तके वितरित करण्यात आली. सोशल मीडियाच्या … Read more

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या अदितीचा मृत्यू

चिन्मय हॉस्पिटलच्या डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह ६ डॉक्टर व परिचारिकांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपचार करताना प्रचलित मानकांचा अवलंब करण्यात आला नाही, तसेच रुग्णावर योग्य प्रकारे सतत देखरेख ठेवली गेली नाही. उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांची अदिती गिते हिचा मृत्यू झाला. अदिती गिते हिच्या मृत्यूप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चिन्मय हॉस्पिटलचे डॉ. मुकुंद संगमनेरकर … Read more

भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर गुन्हा

साडेसहा कोटींचा केला अपहार : बनावट दस्तऐवज तयार करून केली फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बनावट दस्तऐवज तयार करून भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी पतसंस्थेच्या २५ संचालकांसह ३६ जणांवर ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लेखा परीक्षक सुनिल मथुरा … Read more