आवृत्ती पुणे

मुलाने वृद्ध वडिलांवर वार करून केला खून

टीव्ही बंद करून डोळ्यात ड्रॉप टाकायला सांगितल्याने झाला वाद : कोथरुडमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वडिलांनी टीव्ही बंद करून डोळ्यात ड्रॉप टाकायचे आहेत, असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मुलाने वृद्ध वडिलांच्या तोंडावर, गळ्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. तानाजी पायगुडे (वय ७२, रा. जयभवानीनगर, कोथरुड) असे खून झालेल्यांचे … Read more

किराणा व्यापार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

बदनामीच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल : भाऊ बहिणी विरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बालाजीनगर येथील किराणा दुकानदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव राजस्थानमधील गावी नेल्यानंतर खरी माहिती समोर आली. गावकर्‍यांशी बोलल्यानंतर त्यांच्या भावाला आत्महत्येमागील कारण समजले. बाबुराम मंगाराम चौधरी (वय ४३, … Read more

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्‍या कॉल सेंटरवर गुन्हा शाखेचा छापा

मालवेअरची भीती दाखवून घालत होते गंडा : १६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३४ जणांवर गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांना मालवेअरची भीती दाखवून त्यांच्याकडून अ‍ॅन्टीव्हायरस खरेदी करण्यास भाग पाडून फसवणूक करणार्‍या कॉल सेंटरवर गुन्हा शाखेच्या युनिट-५ पथकाने छापा टाकला. हा कॉल सेंटर हडपसरमधील मगरपट्टा रोडवरील सिजन मॉलजवळील मार्वल फिगो बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर सुरू … Read more

जय शिवराय प्रतिष्ठानकडून ४१ शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आधार, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विशेष मदत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन जय शिवराय प्रतिष्ठानतर्फे बार्शी ४१ शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये ३८ कुटुंबांना प्रत्येकी ३ हजार रुपये तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख रक्कम बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख, माजी गटनेते विजय … Read more

माँ आशापुरा माता नवरात्र उत्सवात वाहतूक पोलिसांना १२०० हेल्मेट भेट

लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने हेल्मेट व शिलाई मशिन भेट महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माँ आशापुरा माता मंदिरात सुरु असलेल्या नवरात्र उत्सवात लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या वतीने पुणे शहरातील वाहतूक पोलिसांन १२०० हेल्मेट भेट देण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत हे हेल्मेट भेट … Read more

सायबर चोरट्यांचा पाठलाग करुन उर्से टोलनाक्यावर जेरबंद

शेअर मार्केट गुंतवणुकीतून दीड कोटींची फसवणूक : इचलकरंजीतील दोन भामटे गजाआड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग करणाऱ्या तळेगाव येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ५४ लाख ५६ हजार ५५४ रुपयांची फसवणूक करणाऱ्या इचलकरंजी येथील दोन भामट्यांना सायबर पोलिसांनी उर्से टोलनाक्यावर थरारक पाठलाग करून अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावे अक्रम शमशुद्दीन शेख (३३, … Read more

गँगस्टर निलेश घायवळसह कुटुंबीयांची बँक खाती गोठविली

निलेश, पत्नी, भाऊ, भावजय यांच्या १० बँक खात्यांमध्ये होते ३८ लाख २६ हजार रुपये महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात कारवाई झालेला गुंड निलेश घायवळ परदेशात पसार झाल्यानंतर पोलिसांनी घायवळसह त्याच्या कुटुंबीयांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली. घायवळ, त्याचे कुटुंबीय तसेच त्याच्याशी संबंधित एका कंपनीची १० बँक खाती पोलिसांनी गोठविली आहेत. या बँक … Read more

आंदेकर टोळीच्या बेकायदा बांधकामावर पोलिसांची कारवाई

बंडु आंदेकर कुटुंबाची अनाधिकृत घरे, पत्राशेड, टपऱ्या तसेच स्वच्छतागृह जमीनदोस्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणातील सूत्रधार आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडु आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी घरासमोर केलेल्या बेकायदा बांधकामांवर पुणे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने कारवाई करत ती जमीनदोस्त केली. आंदेकर कुटुंबीयांनी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात बेकायदा बांधकामे केली होती. आंदेकर … Read more