आवृत्ती पुणे

नवरात्रीत उपवासाचे पदार्थ घेताना घ्यावयाची काळजी : अन्न व औषध प्रशासनाचा सल्ला

महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. मात्र अशा वेळी भगरसह इतर उपवासाचे पदार्थ खरेदी आणि सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, उपवासाचे पदार्थ योग्य पद्धतीने तयार करून आणि … Read more

लिओ क्लब बार्शी टाउनचा पूरग्रस्त मदत उपक्रम

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिला दिलासा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे अनेक भाग पूरग्रस्त झाले. विशेषतः कांदलगाव, देवगाव आणि इतर काही गावांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने सुमारे 40 ते 45 घरं पाण्याखाली आली होती. शेतकऱ्यांचेही भरपूर नुकसान झाले असून पिकं खराब झाली. या कठीण परिस्थितीत … Read more

पुण्यात आणखी एका कुख्यात गुंडावर बुलडोझर कारवाई

बंडु आंदेकरनंतर टिपू पठाणच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धडाकेबाज बुलडोझर कारवाईची देशभर चर्चा झाली होती. त्याच धर्तीवर आता पुणे पोलिसांनीही गुंडांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्याची मोहीम सुरू केली आहे. गुंड बंडु आंदेकरच्या अनधिकृत बांधकामांसह त्याच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या टपऱ्या व स्टॉल्सवर पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेने नुकतीच … Read more

लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठी एका दिवसात एसीबीच्या जाळ्यात

प्रस्तावित रिंग रोडमधील जमिनीच्या ७/१२ उताऱ्यांची प्रत देण्यासाठी मागितली होती लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रस्तावित रिंग रोडमधील अधिग्रहित जमिनीच्या ७/१२ तसेच ८ अ उताऱ्यांच्या प्रतीसाठी लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून पकडले. ही कारवाई २५ सप्टेंबर रोजी हवेली तहसीलदार कार्यालयाबाहेर करण्यात आली. या प्रकरणी हवेली तालुक्यातील तलाठी प्रेरणा … Read more

गुंड निलेश घायवळसह १० जणांवर मोक्का कारवाई

कोथरुड गोळीबार प्रकरण : बंडु आंदेकर टोळीनंतर घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : साईड दिली नाही म्हणून तरुणावर गोळीबार करणे तसेच पूर्ववैमनस्यातून आणखी एका तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या घायवळ टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. रस्त्यात थांबलेल्या तरुणांनी साईड न दिल्याने घायवळ टोळीतील गुंडांनी प्रकाश धुमाळ … Read more

चायनीज सायबर चोरट्यांसाठी कोंढव्यातून चालवत होते रॅकेट

१५० जणांची २० ते २५ कोटींची फसवणूक करणारी टोळी जेरबंद : पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणुक करण्यासाठी चायनीज सायबर चोरट्यांना येथील बँक खाती उपलब्ध करुन देणारे रॅकेट अजून एकदा दिसून आले आहे़ या चोरट्यांनी १५०  ते १६० नागरिकांची अंदाजे २० ते … Read more

एमआयटीची अडीच कोटींची फसवणुक करणारा सायबर चोरटा जेरबंद

लंडन युनिर्व्हसिटीतून पीएचडी केलेला, युपीएससी पास मास्टर माईडचा हात, सायबर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयआयटी मुंबईतील प्राध्यापकाच्या नावाने प्रकल्प देण्याच्या बहाण्याने एमआयटीची २ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या सायबर चोरट्याला सायबर पोलिसांनी हैद्राबाद येथून जेरबंद केले आहे. सितैया किलारु (वय ३४, रा. मेहेर रोड, याप्रल, हैद्राबाद, तेलंगणा) असे या सायबर चोरटयाने … Read more

पिस्टलसह विमानतळावर आलेल्या महिलेवर गुन्हा

विमानतळावर घेऊन आल्या विनापरवाना पिस्टल व २ जिवंत काडतुसे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विनापरवाना पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे घेऊन विमानतळावर आलेल्या एका महिलेवर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैशाली वैभव दोशी (वय ४४, रा. अदित्य कॉम्प्लेक्स, हरिकृपानगर, इंदापूर रोड, बारामती) असे महिलेचे नाव आहे. त्या पुणेहून इंदौर मार्गे दिल्लीला जाणार होत्या. २३ … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या क्लास शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी

शिकवणीसाठी घरी येणाऱ्या मुलीवर २ ते ३ महिने केला अत्याचार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूजा सांगणारा पुजारी सायंकाळनंतर मुलांचे क्लास घेत असे. या क्लासला येणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या क्लास शिक्षकाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. संजय रमेश शर्मा (वय ५६, रा. राधिका एम्पायर, जगतापनगर, वानवडी) असे या नराधमाचे नाव … Read more