आवृत्ती , पुणे

अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून ड्रग्ज रॅकेटचा उलगडा

३०० जणांना ड्रग्ज विकल्याचे निष्पन्न : उत्तमनगर पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर गेले ८ महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला उत्तमनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) व दोन मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईलमधील व्यवहारांवरून या गुन्हेगाराने तब्बल २५० ते ३०० जणांना अंमली पदार्थ विकले असून, त्यातून त्याच्याकडे … Read more

दोघा ज्येष्ठ नागरिकांची ३ कोटींची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष : डिजिटल अरेस्टची दाखविली होती भीती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची ३ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याच्या बतावणीने सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. दुसऱ्या … Read more

अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर यांना क्लिन चिट

शस्त्रपरवाना प्रकरणी गृहविभागाचे स्पष्टीकरण : तरतुदींचे पालन करूनच शस्त्र परवाने महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलिसांकडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या शस्त्रपरवान्यांमध्ये कोणतीही बेकायदेशीरता आढळून आलेली नाही, असे स्पष्ट करत गृहविभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे. सर्व परवाने शस्त्र अधिनियम १९५९ आणि शस्त्र … Read more

भगवान महावीर स्वामीजी यांच्या जन्मकल्याणकानिमित्त पुण्यात भव्य शोभायात्रा

‘त्रिशला नंदन वीर की… जय बोलो महावीर की’ जयघोषात भक्तिमय वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की…’, ‘प्रेम से बोलो जय महावीर’ अशा जयघोषात तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आज (दि. ३१) भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगलवाद्यांच्या सुरात भगवान महावीर … Read more

१२६५ ट्रिपल सीट वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात

२३४ मॉडिफाईड सायलेन्सर, ८५२ वाहने जप्त : ५१ लाखांचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या तीन दिवसांत संपूर्ण शहरात ट्रिपल सीट वाहनचालक, मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या बुलेट मोटारसायकली आणि ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम राबवली. त्यात १२६५ ट्रिपल सीट चालकांवर कारवाई करण्यात आली. मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर असलेल्या ३२० बुलेटवर … Read more

जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जयराज अँड कंपनीला Great Place to Work India कडून प्रतिष्ठित ‘ग्रेट प्लेस टू वर्क®️ सर्टिफाइड™️’ मानांकन प्राप्त झाले आहे. कर्मचारी अनुभव, विश्वास आणि सकारात्मक कार्यसंस्कृती जपण्यातील कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. या मानांकनासाठी संस्थेकडून कर्मचारी विश्वास, कामाचे वातावरण, नेतृत्व आणि व्यवस्थापनाच्या धोरणांचे सखोल … Read more

वन सर्व्हेक्षकाला लाच घेताना अटक

जमिनीवरील ७/१२ वरील वन क्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी ७ लाच घेताना पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खासगी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील वन क्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी एजंटकडून ४ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वन विभागातील वन सर्व्हेक्षकाला सापळा रचून रंगेहाथ पकडले. उदयसिंग भीमराव कुंभार (वय ४६, सध्या रा. कात्रज, मूळ रा. सातारा) असे … Read more

सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १ वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात केले स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हवेली तालुक्यातील किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून, त्याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सुरज महेंद्र नांगरे (वय २१, रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. … Read more

विविध राज्यांत ५० पेक्षा जास्त घरफोड्या करणारा बांगलादेशी जेरबंद

अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने केली अटक : ६ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रात ५० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अलंकार पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले. मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, रा. साऊथ डोनिया, काडोमटोली, डोनिया, ढाका, बांगलादेश, ऊर्फ नेवानाथ विनोद कुमार, रा. व्यंकटपूर, … Read more

कारागृह पोलीस भरती दरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील शनिवारी सकाळची घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारागृह पोलीस भरतीदरम्यान १६०० मीटर मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर शनिवारी सकाळी घडली. पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रिया … Read more