आवृत्ती , पुणे

मसाज घेताना महिलेचे व्हिडिओ काढून मागितली खंडणी

धनकवडीतील आयुर्वेदिक उपचार केंद्रातील घटना : तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे़ तु टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक … Read more

शिवराज्य सेनेचे सर्जिकल स्ट्राईक आंदोलन

शिवसृष्टीत खऱ्या इतिहासाचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी नगरपरिषद तर्फे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग शिल्परूपात साकारण्यात आले आहेत. तथापि, अफझल खान वध आणि लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा ऐतिहासिक प्रसंग शिवसृष्टीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील हे दोन प्रसंग अतिशय … Read more

२००७ बॅचच्या सोलापूर ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न

वामन यलमार, दादासाहेब सरवदे आणि “आयर्न मॅन” अमृत खेडकर यांचा विशेष सत्कार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर – पवन श्रीश्रीमाळ : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील २००७ बॅचच्या पोलीस हेड कॉन्स्टेबलनी एका भव्य स्नेहमिलन गेट-टुगेदरचे आयोजन करून आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे केले. या सोहळ्याने केवळ आठवणींना उजाळा दिला नाही, तर सहकार्याच्या भावनेला नव्याने चेतना दिली. … Read more

मानवासाठी झोप ही सर्वात मोठी देणगी – डॉ. राहुल कुलकर्णी

भारती हॉस्पिटल येथे डिपार्टमेंट ऑफ स्लीप मेडिसिनचे उदघाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मानवासाठी झोप ही सर्वात मोठी देणगी असून, झोप व्यवस्थित असेल तरच निरोगी आयुष्याचा पाया रचला जातो. असे मत प्रसिद्ध मेंदूविकारतज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांनी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे डिपार्टमेंट ऑफ स्लीप मेडिसिन या नव्या विभागाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले … Read more

खोटा रहिवासी पुरावा दिल्याने १८ पालकांवर गुन्हा दाखल

आरटीई प्रवेशासाठी केली शासनाची दिशाभूल : गटशिक्षणाधिकार्‍यांची तक्रार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आरटीई प्रवेशासाठी (शिक्षणाचा हक्क) खोटा रहिवासी पुरावा सादर करुन शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी पुण्यातील १८ पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला गटशिक्षणाधिकारी यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या … Read more

मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकादेशीर विक्री

नशेसाठी विकणार्‍या दोघांना अटक : १ लाख रुपयांच्या १९० बाटल्या जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन) इंन्जेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयांच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन)च्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. घुलेवस्ती, … Read more

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2025 … Read more

गंगाधाम चौकातील चुकीच्या उड्डाणपुलाला कोणाचाही विरोध नाही

प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधक मूक का ? महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी गंगाधाम चौकात मोठा उड्डाणपूल उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या पुलाच्या रचनेत मोठी त्रुटी असून तो चुकीच्या दिशेने उभारला जात आहे. ही बाब उघड झाल्यानंतरही प्रशासन, सत्ताधारी पक्ष आणि विरोधक पूर्णपणे शांत आहेत. लोकशाहीत जनतेच्या हितासाठी काम … Read more

हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरात 1008 बाटल्या संकलित

पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ दुगड ग्रुप व निर्झरा ग्रुपच्या वतीने सलग पाचव्या वर्षी आयोजित भव्य रक्तदान शिबिराला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 1008 बाटल्या रक्त संकलित करून नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली. हे रक्तदान शिबिर आदिनाथ जैन स्थानक, पुणे येथे … Read more