आवृत्ती , पुणे

चुहा गँग आता अंमली पदार्थाच्या तस्करीत

तडीपार असताना शहरात असलेल्या चुहा गँगकडून मेफेड्रॉन जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दंगली, दरोडा, जबरी चोरी, खंडणी अशा गुन्ह्यांमध्ये असलेली चुहा गँग आता अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतली असल्याचे समोर आले आहे. मोक्का प्रकरणात चुहा ऊर्फ तौसिफ याला न्यायालयाने २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. असे असताना तो साथीदारांसह दरोडा टाकण्यासाठी शहरात आला होता. आंबेगाव पोलिसांनी … Read more

भारतीय जैन संघटनेचे ‘राष्ट्रीय अधिवेशन’ पुणे येथे संपन्न होणार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक-कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, महिला सक्षमीकरण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन, जलस्त्रोत विकास, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या देशातील अग्रगण्य सामाजिक संस्था भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) ‘राष्ट्रीय अधिवेशन’ दि. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी, पुणे येथे संपन्न होणार आहे. … Read more

कोर्टाने तडीपार केले असताना चुहा गँग जेरबंद

पिस्टल, काडतुस, मॅफेड्रॉन रोकड हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्का प्रकरणात न्यायालयाने २ वर्ष तडीपार केले असतानाही चुहा ऊर्फ तौसिफ हा शहरात आला. आपल्या टोळक्यासह दरोड्याच्या तयारीत असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी या चुहा गँगच्या चौघांना शस्त्रासह पकडले. तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद … Read more

स्मशानभूमीतील लाकडांनी उघडकीस आणला खून

वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इंदापूर तालुक्यातील तावशी गावच्या स्मशानभूमीमध्ये लाकडामध्ये मानवी अवयव जळत असून जवळच मोठ्या प्रमाणावर रक्त पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे अवयव नेमके कोणाचे आहेत, याची काहीही माहिती नसताना कोणताही पुरावा हाताशी नसताना वालचंदनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. … Read more

नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नराधम पिताच आपल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जवळपास वर्षभर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात कोणाला काहीही सांगायचे नाही, नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी जवळपास वर्षभर आपल्या बापाचा अत्याचार सहन करत होती. याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने … Read more

पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु

पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात लग्नाला आल्यानंतर घरी परत जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना पीएमपी बसने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यु झाला तर मुलगी जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय सांळुके (वय ५७, रा. शुक्रवार पेठ, टिळक रोड) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विशाल दत्तात्रय सांळुके (वय ३८, … Read more

ट्रॅफिक समस्या आणि प्रदूषणावर जैन सोशल ग्रुप-युथ पुणे सेंट्रलचा उपक्रम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सध्याच्या वाढत्या ट्रॅफिक समस्यां आणि प्रदूषणाच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, जैन सोशल ग्रुप-युथ पुणे सेंट्रलने एक स्तुत्य उपक्रम राबवला. रविवार, 24 नोव्हेंबर रोजी, या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी पुणे मेट्रोचा वापर करून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा संदेश दिला. सकाळी सर्व सदस्य स्वारगेट मेट्रो स्थानकावर एकत्र जमले आणि बॅनर व पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांनी … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत साजरा झाला फाउंडेशन डे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ शाळेचा फाउंडेशन डे (स्थापना दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस शाळेच्या आतापर्यंतच्या यशाचा आनंद साजरा करण्याचा आणि भविष्यात गाठायच्या उद्दिष्टांचा आढावा घेण्याचा दिवस ठरला. शाळेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा विचार करता, शैक्षणिक गुणवत्तेचा उंचावलेला स्तर आणि शाळेची झालेली वाढ हे लक्षणीय ठरले आहे. या … Read more

सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन

बौद्धिक जिज्ञासा आणि आत्मविश्वास वृद्धीसाठी स्टेम (STEM ) प्रदर्शनाची सातत्याने आवश्यकता : प्रा डॉ संजय बी चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने सूर्यभवन, बावधन येथे विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प आणि प्रयोगांद्वारे वैज्ञानिक संकल्पना आणि तत्त्वे विद्यार्थी शोधू शकतात, ज्यामुळे त्यांना विज्ञान आणि गणिताचे सखोल ज्ञान विकसित करण्यात … Read more

जय आनंद ग्रुपच्या वतीने राजेंद्र बाठिया यांना “समाजभूषण” पुरस्कार

आदेश खिंवसरा “जय आनंद मानव सेवा” पुरस्काराने सन्मानीत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात जय आनंद ग्रुपच्या वतीने रविवारी दि (24 नोव्हेंबर) रोजी पूना मर्चेंट चेंबर चे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ तर समाजसेवक आदेश खिंवसरा यांना ‘जय आनंद मानव सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘आपण अनेक संस्थांशी जोडलेलो … Read more