आवृत्ती पुणे

डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे : तुकाराम गोडसे

प्रिंट व डिजिटल मिडिया सुसंवाद बैठक लोणी काळभोर येथे संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सध्याचा काळ हा डिजिटल मिडीयाचा काळ आहे.दहा वर्षापूर्वी डिजिटल मीडियाची एवढी क्रेझ नव्हती पण जसा काळ बदलत गेला तसा डिजिटल मीडियामध्ये नवीन प्रणाली उदयास आली. युट्युब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम आहे. त्या माध्यमातून करोडो लोक पैसा कमवत आहेत. … Read more

जुने मतदार ओळखपत्र आहे, आता पुन्हा नव्याने काढा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ जाहीर झाला आहे. बाहेरील जिल्ह्यातील जुने एम.टी.सिरीजचे कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या आणि जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी … Read more

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को जीतो का आमंत्रण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो अपेक्स की ओर से वाराणसी में 9 से 11 ऑगस्ट 2024 को समीक्षा का प्रोग्राम होने जा रहा है। इस प्रोग्राम के लिए उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को प्रमुख अतीथि के रुप मे जीतो के राष्ट्रीय अध्यक्ष कांतिलाल ओसवाल और सेक्रेटरी मनोज मेहता इन्होंने आमंत्रित किया।

दुष्काळात पुरंदरच्या मुक्या जनावरांना मिळाला आधार

‘बीजेएस’ची यमाईशिवरी, वाल्हेची चारा छावणी ठरली वरदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना (बीजेएस) या सामाजिक संस्थेने यमाई शिवरी येथे दि. २८ एप्रिल, तर वाल्हे (ता. पुरंदर) येथे दि. १५ मे पासून प्रत्येकी ५०० जनावरांच्या क्षमतेची चारा छावणी उभी केली. १००० जनावरांच्या दोन चारा छावणीमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, शिवाय पशुपालकांच्या चेहऱ्यावरची … Read more

पुण्यात जुलै महिन्यात बरसला दोन महिन्यांचा पाऊस

वरुण राजाची यंदा चांगलीच कृपा दृष्टी : प्रत्यक्षात बरसला ६१६ मिमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील अनेक भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. ताम्हिणी, लोणावळा, पुणे शहर, लवासा या भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. धरणे देखील भरली आहेत. जुलै महिन्यात शिवाजीनगरला झालेला पाऊस हा २०१२ नंतरचा सर्वाधिक आहे. यंदा जुलैमध्ये ३९४ मिमी पाऊस पडला. … Read more

गुलटेकडी बाजार समितीचा भुसार बाजार ‘गोत्यात’

पणन सहसंचालकांनी दिले चौकशीचे आदेश : आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती करणे अपेक्षित असताना शेकडो कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ लिपिकांची भुसार विभागप्रमुख व वाहन प्रवेश विभाग पदावर नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती नियमबाह्य ठरवावी, तसेच त्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार चौकशीचे आदेश दि. २७ जूनला देण्यात आले होते. … Read more

स्वप्नीलने भारताला मिळवून दिले तिसरे कास्यपदक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापूरचा २८ वर्षांचा नेमबाज स्वप्निल कुसाळेने गुरुवारी ५० मीटर रायफल श्री पोझिशनच्या अंतिम फेरीत कांस्य जिंकून इतिहास रचला. पात्रता फेरीत सातवे स्थान मिळविल्यानंतर कुसाळेने फायनलमध्ये ४५१.४ गुणांसह तिसरे स्थान पटकावून देशाला आणखी एक पदक जिंकून दिले. चीनचा लियू युकून याने ४६३.६ गुणांसह सुवर्ण आणि युक्रेनचा सेरही कुलिश याने … Read more

लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मिळाली मुदतवाढ

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे … Read more

राज्यपालांनी स्वीकारला पदभार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात पदभार स्वीकारला.

प्रेमिकेच्या मुलावर वार करण्याचा प्रयत्न

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबध तुटल्या नंतर प्रेमिकेला त्रास देणाऱ्या एका युवकाने फिर्यादी महिलेच्या मुलावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर मध्ये बुधवारी भरदिवसा ११:३० वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी ससाणेनगर मधील ३५ वर्षीय … Read more