खडक पोलीस स्टेसनमध्ये फिर्याद : गंज पेठेतील महात्मा फुले स्मारकाजवळील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आताच्या आता घर खाली करून बिल्डरला द्या नाही तर बघून घेईन अशी धमकी देणाऱ्या महिलेसह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. गंज पेठेतील महात्मा फुले स्मारकाजवळ ही घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली.
अब्बालअली शेख (वय ५५, रा. स.नं.३६५-अ, गंज पेठ, पुणे यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार महिलेसह सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या घरात घुसून आरोपींनी अंगावर धावून जात मारहाण केली. घरातील संसारोपयोगी वस्तू अस्थाव्यस्थ टाकून नुकसान केले. फिर्यादीची पत्नी भांडण सोडविण्यास गेली असता, तिलाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला आताच्या आता घर खाली करून बिल्डरला द्या, नाहीतर बघून घेईन अशी धमकी दिली आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास खडक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी करीत आहेत.
















