हडपसर पोलिसांची कामगिरी : एक लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत चोरून जुगार खेळणाऱ्या १३ जणांना ताब्यात घेऊन हडपसर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
किरण जगताप (वय ४०, हडपसर), पोपट जगताप (वय ४६, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे), गणेश माने (वय ३१, काळेपडळ, हडपसर), अजिंक्य शिंदे (वय ३०, रा. ससाणेआळी, हडपसर), चंदन सिंग (वय २०, हडपसर), सत्यवान चव्हाण (वय ४२, साडेसतरानळी, हडपसर), विक्रम खोमणे (वय ३४, रा. काळेपडळ, हडपसर), दीपक ढावरे (वय ३०, रा. चिंतामणीनगर, हडपसर), रोहन मोडक (वय २५, रा. वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे), औदुंबर देवळे (वय ४८, रा. मांजुरी बु।।, पुणे), जगदीश बेलाने (वय ६८, रा. लँडमार्क सोसायटी, उंड्री, पुणे), श्री सत्यदेव जाधव (वय २८, रा. डी. पी. रोड, हडपसर) आणि अलताब युसूफ इनामदार (वय ४८, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, हडपसर-रामोशी आळी येथे बंद खोलीत चोरून जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख ५९ हजार रुपये, ९ मोबाईल फोन, ३ मोटारसायकल, तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सागर दळवी, राहुल मद्देल यांच्या पथकाने ही कारवाई केली.