डेक्कन पोलिसांची कामगिरी : सह्याद्री हॉस्पिटलमध्ये करतो हाऊसकिपिंगचे काम
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वाहनचोरीतील आरोपीला २४ तासात अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून डेक्कन पोलीस स्टेशनच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आरोपी तपास करून गुन्हा उघडकीस आणला.
किसन लक्ष्मण कदम असे अटक केलेल्याचे नाव आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये वाहनचोरीतील गुन्ह्याचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला. त्यावेळी वाहनचोरी डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हाऊस कीपिंगचे काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून हिरो होंडा कंपनीची ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. आरोपीला पोलीस कोठडी घेतली असून, डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, सहायक पोलीस निरीक्षक झरेकर, पोलीस अंमलदार संतोष बोरकर, भुवड, दादासाहेब बर्डे, बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
