पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ज्येष्ठांचे अधिकार व सुरक्षा विषयावर प्रशिक्षण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मेन्टेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पॅरेन्ट्स अँड सीनिअर सिटीझन अॅक्ट २००७ विषयी अॅड. निर्मला सामंत प्रभावलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्मितेश शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अडचणी, कायदशीर तरतुदी व अनुभव याविषयी प्रत्यक्ष अनुभव कथन केले.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्तालयातील कॉप्स एक्सलन्स हॉलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व सुरक्षा या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. याप्रसंगी फेसकॉनचे अध्यक्ष अरुण रोठे, निवारा वृद्धाश्रमचे प्रकाश कुलकर्णी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, सहायक पोलीस आयुक्त कोथरूड, विश्रामबागवाडा, लष्कर, खडकी, वानवडी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
यावेळी मुंबईचे माजी महापौर अॅड. निर्मला सामंत प्रभावलकर, जनसेवा फाउंडेशन पुणेचे स्मितेश सुभाष शहा, हेल्पएज संस्थेचे प्रकाश नारायण बोरगावकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार व सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले. गुन्हे शाखा भरोसा सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षिका योगिता बोडखे, सुजाता शानमे, अर्चना कटके, ज्येष्ठ नागरिक कक्षाचे अंमलदार, एनजीओ, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या अधिकारी योगिता बोडखे यांनीसूत्रसंचालन केले. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांनी आभार मानले.
