गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : १५ दुचाकी जप्त करून १५ गुन्हे उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वाहनचोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून १५ दुचाकी जप्त करून १५ गुन्हे उघडकीस आणले.
निलेश शिवरकर (वय-33, रा. म्हातोबाची आळंदी, पानमळा, ता. हवेली), प्रशांत चव्हाण (वय-34, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी वाघोली बाजारतळ येथे येणार असल्याची माहिती युनिट-२च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना सापळा रचून अटक केली. आरोपीकडे दुचाकीचा तपास केला असता आरोपींनी ही दुचाकी आळेफाटा येथून चोरल्याची कबुली दिली. आरोपींनी हडपसर-5, लोणीकंद-4, चंदननगर-2, कोंढवा-1, कोथरुड-1, पुणे ग्रामीणच्या यवत-1 आणि आळेफाटा पोलीस ठाण्यातील-1 असे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
