भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : वाहन दुचाकी ई बाईक चोरणा-या सराईत आरोपीस अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. विश्रूत नवाथे, (वय ३९ वर्षे, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खु,) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन १,१५,००० रुपयांची दुचाकी ई बाईक जप्त करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपींचा शोध घेत होते. पोलीस अंमलदार महेश बारावकर, अशिष गायकवाड यांना हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी याने केला आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीचा शोध घेत असताना तो सच्चाईमाता, पाण्याची टाकीजवळ सापडून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सचिन सरपाले, अवधतु जमदाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, नवनाथ खताळ, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.