महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : इंदीरानगर व शिवशंकर नगर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आरोग्य दूत डॉ.राहुल घुले यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. राहुल घुले सर यांनी आपण करीत असलेल्या आरोग्य विषयक कामाची माहिती देऊन मुस्लिम समाजासाठी दर शुक्रवारी ऑफिसला वेळ दिलेली आहे. यामध्ये आरोग्यविषयक व रोजगार संदर्भात ते मुस्लिम समाजाचे काम पाहणार आहेत, असे आश्वासन डॉ. राहुल घुले यांनी दिलेले आहे.
मुस्लिम एकताचे संस्थापक अध्यक्ष आसिफ जमादार यांनी प्रास्ताविक केले. एजाज भाई काजी यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी कुंभार सर, हाफीज गुलजार टेलर (काजी), आदम पिरजादे, शमशेर पठाण, शमीम भाई सय्यद, शेख साहब (महाराष्ट्र पोलीस), कलीम पठाण, रईस पठाण आदी उपस्थित होते.
