शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय भूम प्राणीशास्त्र विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर. बोधगया व भारतीय विज्ञान मंडळ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने चर्चासत्र आयोजित केले होते.
या चर्चासत्राचा शुभारंभ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम यांच्या हस्ते झाला. पंडित दीनानाथ वीर गुरुवर सिंग विद्यापीठ अरह बिहार यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. प्रा. सी मंजुलता यांची यावेळी उपस्थिती होती. या चर्चासत्र परिषदेचे उद्घाटन डॉ जी डी खेडकर छत्रपती संभाजी नगर यांनी केले.
या प्रसंगी विद्या विकास मंडळ सचिव श्री काटे, सहसचिव एस. एस. शिंदे, उत्तम बोराडे, प्राध्यापक टी. आर. बोराडे उपस्थित होते. यावेळी डॉ मिलिंद शिरभाते यांनी जैवविविधतेचे महत्त्व पटवून दिले. डॉ. बी. एल. चव्हाण यांनी जैवविविधता कायदा या विषयाचे गांभीर्य पटवून दिले. त्यानंतर डॉक्टर सोमनाथ वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
चर्चासत्राचे पहिले सत्र हे ऑनलाइन पद्धतीने सुरु झाले. या सत्रात कॉलिफॉर्निया विद्यापीठाचे पी. नागराजराव यांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले, त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ. करुणा, डॉ, सुनिता बोर्डे. परदेशी, डॉ. सी मंजुलता, एच. एस. जगताप, डॉ. अनिल परदेशीं, डॉ. टी. आर. देशमुख, डॉ अपर्णा कलवटे, प्राध्यापक टी आर बोराडे, डॉ विक्रम खिल्लारे यांची विशेष उपस्थिती होती. तर डॉ अपर्णा कालावते यांनी शेणाचे बीटल या विषयावर तर डॉ एच. एस जगताप यांनी मत मत्स्य शेतीवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस बी चंदनशिव उपस्थित होते. या वेळी या चर्चासत्राला 96 शोध निबंध आले तर 175 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कॉलेजचे सर्व प्राध्यापक हजर होते तसेच सर्व प्राध्यापकानी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रा. दीप्ती गिरी व प्रा.जीएस खंदारे यांनी केले तर आभार डॉ नितिन पडवळ यांनी मानले.
